मतदानानंतर काय म्हणतात दिव्यांग?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:52 AM2019-10-22T00:52:08+5:302019-10-22T00:52:56+5:30

Maharashtra Assembly Election 2019 विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या सुविधांमुळे दिव्यांगांना चांगला लाभ झाला. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा यांनी केलेल्या नियोजनामुळे दिव्यांग मतदारांना मतदान मोहिमेत सहभागी होता आले.

 What is Divya called after voting? | मतदानानंतर काय म्हणतात दिव्यांग?

मतदानानंतर काय म्हणतात दिव्यांग?

Next

विधानसभा निवडणुकीत दिव्यांग बांधवांसाठी दिलेल्या सुविधांमुळे दिव्यांगांना चांगला लाभ झाला. निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक शाखा यांनी केलेल्या नियोजनामुळे दिव्यांग मतदारांना मतदान मोहिमेत सहभागी होता आले. - बबलू मिर्झा,  अध्यक्ष, दिव्यांग कल्याणकारी संघटना
शासनाने पुरविलेल्या सुविधा उत्तम होत्या. केंद्रावर आणि केंद्राबाहेर दिव्यांग बांधवांची अधिक काळजी घेण्यात आली. मतदानाला येण्यापासून ते मतदान केल्यानंतरही घरपोच सुविधा देण्यात आल्यामुळे मतदान करताना कोणतीही अडचण निर्माण झाली नाही.
- मुकेश कोठुळे, नाशिक
आमच्यासारख्या दिव्यांगांनी मतदानाचा हक्क बजावणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मात्र प्रशासनाने शहरातील अनेक दिव्यांगांना मतदानासाठी ने-आण करण्यासाठी कुठलीही सोय केल्याचे दिसून आले नाही. तसेच प्रशासनाने दिव्यांगांसाठी शहरात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांची मदत घेतली असती तर जे दिव्यांग मतदानापासून वंचित राहिले त्यांनाही मतदान करता आले असते. - अरुण भारस्कर, अध्यक्ष, ब्लार्इंड वेल्फेअर आॅर्ग.

Web Title:  What is Divya called after voting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.