उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडाचे वाहन जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 00:34 IST2018-06-01T00:34:40+5:302018-06-01T00:34:40+5:30
सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण येथे खैर लाकडासह वाहन जप्त केले. खैर लाकूड तोडून काळाबाजारात नेले जात असण्याची माहिती वनविभागाला मिळाली.

उंबरठाण वनपरिक्षेत्रात खैर लाकडाचे वाहन जप्त
सुरगाणा : तालुक्यातील उंबरठाण येथे खैर लाकडासह वाहन जप्त केले. खैर लाकूड तोडून काळाबाजारात नेले जात असण्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनविभागाच्या पथकाने सदर वाहन क्र. एमएच १५ टीटी १९२० या वाहनातून खैर लाकूड जप्त केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उंबरठाण येथे खैर लाकडाची चोरटी वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली. पहाटे पाच वाजेच्या सुमारास एक संशयित वाहन म्हैसखडक फाट्यावरून वेगात गेल्याने कळाले. धरमपूर रोडवर सदर वाहन अडविले असता टेंपोचालकास विचारपूस केली असता कोंडा असून, धरमपूर येथे जात असल्याचे सांगितले. सदरची मोहीम यशस्वी करण्यासाठी उपवनसंरक्षक सुजित नेवासे, सुधीर कवर व योगेश सातपुते, वनपाल तुंगार माणिक साळुंके, हिरामण महाले, भाऊसाहेब गरुड, बोडके, भोये, वाघ नीलेश भोये आदींनी कारवाई केली.