शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय

By admin | Updated: February 24, 2016 00:04 IST

पंचवटी परिसरात पाण्याचा अपव्यय

पंचवटी : गंगापूर धरणातील जलसाठा कमी झाल्याने प्रशासनाने दर आठवड्याला शहरातील एका भागात संपूर्ण दिवसभर पाणीकपात जाहीर केली आहे. पंचवटीतदेखील दर गुरुवारी पाणीकपात केलेली असली तरी सध्या पंचवटी परिसरात सुरू असलेली नवीन बांधकामे, वाहन सर्व्हिस स्टेशन, तसेच सार्वजनिक स्टॅँडपोस्ट व महापालिकेच्या जलवाहिन्यांना लागलेली गळती यामुळे दैनंदिन हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. प्रशासनाने एकीकडे पाणी जपून वापरण्याबाबत आवाहन केले असले, तरी नागरिकांनी मात्र मनपाच्या या आवाहनावर पाणी फिरवले असल्याचे बघायला मिळत आहे. पंचवटी परिसरात नव्याने अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी दैनंदिन पाणी मारण्याचे काम केले जातेच शिवाय दुचाकीच्या सर्व्हिस स्टेशनवर वाहने धुण्याच्या नावाखाली शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याचाच अपव्यय होत आहे. पंचवटीत अनेक ठिकाणी महापालिकेचे स्टॅँडपोस्ट असून, या स्टॅँडपोस्टवर पिण्याचे पाणी भरण्याबरोबरच महिलावर्ग धुणी-भांडी करत असल्याचे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. हिरावाडीतील भिकुसा पेपर मिलमागे असलेल्या जलवाहिनीला गेल्या अनेक महिन्यांपासून गळती लागल्याने दैनंदिन हजारो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी होत आहे. जलवाहिनी नादुरुस्त असल्याने २४ तास पिण्याचे पाणी वाया जाते. सदरची बाब लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी अनेकदा मनपाच्या निदर्शनास आणून दिली; मात्र मनपा प्रशासन जलवाहिनी दुरुस्त करण्याच्या कामाकडे उघडपणे डोळेझाक करत असल्याने पाणी गळती थांबणार कशी, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. (वार्ताहर)