राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 05:20 PM2018-08-26T17:20:25+5:302018-08-26T17:22:08+5:30

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत सिन्नर तालुक्यातील २५ योजनांमधील ३४ गावे व ४१ वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत. सन २०३५ सालची लोकसंख्या लक्षात घेवून या पाणीपुरवठा योजनांसाठी २३ कोटी ९ लाख ५५ हजार रूपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे व जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिली.

Water supply scheme approved through National Rural Drinking Water Scheme | राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून पाणीपूरठा योजना मंजूर

Next

राष्ट्रीय ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास यामुळे मदत होणार आहे. भूजलाची घटती पातळी, पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, वाढती लोकसंख्या, पाण्याची वाढती मागणी या कारणांमुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठ्यावर प्रचंड ताण येत आहे. यावर उपाययोजना म्हणून केंद्र शासनामार्फत २००९-१० मध्ये वर्धीत वेग ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमाचे रुपांतर  ग्रामीण पेयजल कार्यक्रमात करण्यात आले आहे. या योजनेत तालुक्यातील आगासखिंड - ९५ लाख ९ हजार, बेलू- ८४ लाख ६० हजार, ब्राम्हणवाडे १ कोटी १० लाख ३९ हजार, चंद्रपूर-खापराळे ३० लाख, चास- २ कोटी १२ लाख, डुबेरे - १ कोटी ५९ लाख ७१ हजार, निºहाळे फत्तेपूर- ५३ लाख ६ हजार, फुलेनगर -१९ लाख, खोपडी बुद्रुक- ५७ लाख २९ हजार, मºहळ खुर्द- ३० लाख, मºहळ बुद्रुक- ७१ लाख ९६ हजार, नायगावसह नऊ गावे- ३ कोटी ५० लाख, नळवाडी- १ कोटी ३ लाख ९५ हजार, पास्तेसह तीन गावे - ८२ लाख, पाथरे बुद्रुकसह तीन गावे- १ कोटी १७ लाख ५० हजार, पाटपिंप्रीसह सात गावे- ५६ लाख, पिंपळे- ८५ लाख १४ हजार, पिंपरवाडी- ३२ लाख, सांगवी- ९५ लाख ५० हजार, शहा- ७० लाख, सोनांब- १ कोटी ५४ लाख ६४ हजार, सोनारी- ७१ लाख १५ हजार, सोनेवाडी- ६९ लाख ७१ हजार, सोनगिरी- ६६ लाख ९२ हजार, सुरेगाव- ३१ लाख ३७ हजार यांचा समावेश करण्यात आला आहे. मंजूर योजनांची लवकरच अंदाजपत्र तयार करून त्यास तांत्रिक मान्यता मिळवून निविदा काढण्यात येणार आहे. टंचाईग्रस्त असलेल्या तालुक्यातील या गावांना पिण्याच्या पाण्याची शाश्वत व्यवस्था होणार असल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त तालुका म्हणून असणारी ओळख पुसरण्यास मदत होणार आहे. सदर गावातील पिण्याची पाण्याची अडचण दुर होवून ग्रामस्थांना स्वच्छ व शुध्द पाणी मिळणार असल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Water supply scheme approved through National Rural Drinking Water Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी