भिंत कोसळून एक ठार; सहा जखमी

By Admin | Updated: July 31, 2014 00:53 IST2014-07-31T00:32:16+5:302014-07-31T00:53:45+5:30

पाथर्डी फाटा : बांधकाम सुरू असलेल्या हरी-विश्व सोसायटीतील घटना

Wall collapses one killed; Six injured | भिंत कोसळून एक ठार; सहा जखमी

भिंत कोसळून एक ठार; सहा जखमी

इंदिरानगर : मुंबई-आग्रा महामार्गावरील पाथर्डी फाटा परिसरात बांधकाम सुरू असलेल्या सोसायटीची संरक्षक भिंत कोसळून पप्पू यादव हा मजूर ठार झाला, तर उर्वरित सहा गंभीर जखमी झाले आहेत़ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
पाथर्डी फाटा परिसरात हरी-विश्व या सोसायटीचे बांधकाम सुरू आहे़ या बांधकामासाठी अनेक मजूर या ठिकाणी झोपडी बांधून राहत असून, सोसायटीच्या संरक्षक भिंतीच्या कडेलाच त्यांच्या झोपड्या आहेत़ बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास या सोसायटीची संरक्षक भिंत अचानक कोसळली़ यामध्ये पप्पू उमेश यादव याचा मृत्यू झाला, तर शिवभजन, रामभजन, छोटू (पूर्ण नाव माहिती नाही), राकेश गौर, धर्मराज शर्मा, मनोरथ हे जखमी झाले़ यातील तिघांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर पाथर्डी फ ाट्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
या दुर्घटनेत जखमी झालेले सर्व कामगार हे उत्तर प्रदेश तसेच बिहारमधील असून, १८ ते २० वयोगटातील आहेत़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ (वार्ताहर)

Web Title: Wall collapses one killed; Six injured