शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:40 AM

आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.

नाशिक : आॅक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज पंचनामे पूर्ण झाल्यानंतर सुमारे साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे. यावरून पिकांच्या नुकसानीचे गांभीर्य समोर आले आहेच आता रब्बी हंगामाचीही चिंता असल्याने शेतकऱ्यांना निदान खरिपाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकºयांना लागून आहे.परतीच्या पावसाने जिल्ह्यातील संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतामध्ये पाणी साचल्यामुळे नुकसानीचे क्षेत्र मोठे असण्याची शक्यता तेव्हाच वर्तविली जात होती. जिल्हा प्रशासनाने ३ लाख ८६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. आता पंचनामे पूर्ण झाल्यानंतर पीक नुकसानीचा आकडा तब्बल साडेतीन लाख हेक्टरने वाढला आहे.नुकसानीचे एकूणच गांभीर्य लक्षात घेता सरसकट पंचनामे ग्राह्य धरून त्यानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी सातत्याने पुढे येत आहेच शिवाय बाधीत शेतकºयांच्या कर्जमाफीचा मुद्दाही जोर धरू लागला आहे. राज्यात अद्याप सरकार स्थापन झाले नसले तर मागील सरकारने दहा हजार कोटींची तरतूद केली आहेच उर्वरित भरपाईसाठी केंद्राकडून मदत मिळविण्यासाठीचे प्रयत्न राजकीय नेत्यांनी सुरू केले आहेत. नुकसानीचा आकडा पाहता ओला दुष्काळ जाहीर करण्यापेक्षाही तत्काळ मदतीसाठी केंद्राचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.जिल्हातील महत्त्वाचे पीक असलेल्या द्राक्षाचे मोठे नुकसान झालेले आहे. याबरोबरच मका, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कांदा यासह अन्य पिकांचे नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार १ हजार ९५९ गावातील ७ लाख ७६ हजार ९७० शेतकरी बाधीत झाले आहे.प्रशासनाकडून युद्धपातळीवर पंचनामे सुरू होते. त्यापैकी ३ लाख ८३२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला होता. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर नुकसानीचा आकडा ६ लाख ४७ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर गेला आहे.६३६ कोटींच्या मदतीची गरजजिल्ह्यातील शेतपीकांच्या नुकसानीसाठी सुमारे ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची गरज असून तसा अहवाल शासनाला पाठविला जाणार आहे. जिरायतीसाठी २७८ कोटी ३० लाख, बागायत पिकांसाठी २११ कोटी ७ हजार तर बहुवार्षिक फळपिकांसाठी १४६ कोटी २८ लाख असे एकूण जवळपास ६३६ कोटी २३ लाख ३३ रुपयांच्या मदतीची अपेक्षा आहे.क्षेत्रानुसार नुकसानीचा अंदाजजिरायत क्षेत्र : ४ लाक ९ हजार २७५ हेक्टर (१९५८ गावांमधील ५ लाख५३ हजार ४८४ शेतकरी बाधीत)बागायती क्षेत्र : १ लाख ५६ हजार ३५० हेक्टर (१ हजार ३६१ गावांमध्ये झाले असून, तेथील २ लाख ३० हजार ७७ शेतकरी बाधीत.बहुवार्षिक फळपिके : ८१ हजार २७० हेक्टर (१२१५ गावे व १ लाख ४ हजार ३६५ शेतकरी बाधीत)तालुकानिहाय नुकसानाची आकडेवारी (हेक्टरमध्ये)नाशिक : १२ हजार ७३२इगतपुरी : १४ हजार ९८त्र्यंबकेश्वर : ०८ हजार ५२दिंडोरी : २४ हजार ५७१पेठ : १३ हजार ६८३कळवण : २९ हजार २५३सुरगाणा : २२ हजार ८११बागलाण : ७४ हजार २४८चांदवड : ५७ हजार ७७२देवळा : ३९ हजार १५८मालेगाव : १ लाख १४ हजार ९४३येवला : ५८ हजार ४१३नांदगाव : ५६ हजार ९४३निफाड : ६३ हजार ८०७सिन्नर : ५१ हजार ७३१

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीRainपाऊस