वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:41 IST2019-08-04T13:37:51+5:302019-08-04T13:41:30+5:30

नाशिक शहरात गेल्या आठवड्यापासून बरसणाऱ्या संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाऱ्या पाण्याच्या लोंढ्यामुळे वडाळा पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते.

Wadala Pathardirod underwater; traffic flows | वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

वडाळा पाथर्डीरोड पाण्याखाली ;वाहतूक विस्कळीत

ठळक मुद्दे वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी इंदिरानगर परिसरात वाहतूक विस्कळीत वाहने पाण्याखाली अडकल्याने नागरिकांचे हाल

नाशिक :  गेल्या आठवड्यापासून बरसणाºया संततधार पावसाने शुक्रवारी मध्यरात्रीपासून जोर धरल्याने शहरातील प्रमुख रस्ते जलमय झाले असून वडाळा पाथर्डी रस्ता अक्षरश: पाण्याखाली गेला होता. या रस्त्याला जोडणाºया उपरसस्त्यांवरून वाहणाºया पाण्याच्या लोंढ्यामुळे वडाळा पाथर्डी रस्त्यावर दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते.
 इंदिरानगर परिसरात वडाळा-पाथर्डी रस्त्यावर गुरुगोविंद अभियांत्रिकी महाविद्यालयापासून ते राजीवनगर चौफूलीपर्यंत रस्त्यांच्या दुतर्फा दोन फुटांहून अधिक पाणी वाहत होते,तर या रसत्याला जोडणाºया उपरस्त्यांवही दीड ते दोन फूट पाणी साचल्याने काही रहिवासी इमारतींच्या वाहनतळांमध्ये पाणी घुसले होते. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला असलेल्या काही दुकानांमध्येही पाणीशिरल्याने व्यापºयांचे दुकानदारांचे हाल झाले. मुख्य रस्त्यांसह या रसत्याला जोडणाºया उपरस्त्यांवरही पाणी साचल्याने या बागातील संपूर्म बाजापेठ बंद होती.  त्याचप्रमाणे  राजीवनगर चौकात अडकेली वाहने राजीवनगरच्या दिशेने बाहेर पडत असली तरी यारसत्यावरही सखल बागात पाणी साचल्याने वाहन चालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागली. 

वाहतूक विस्कळीत 
वडाळा-पाथर्डी रस्त्यावर दोन ते अडीच फुटांहून अधिक पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने या रस्तावरील वाहतूक  विस्कळीत झाली. अनेक वाहनचालाक ांनी रस्ता बदलून अन्य मार्गांचा अवलंब केला. पाथर्डीकडून नशिक - वडाळ््याच्या दिशेने जाणाºया वाहनांनी गुरुगोविंद सिग महाविदयलयापासून मागे फिरून मुंबई आग्रा महामार्गाने वाहने वळविली. तर बोधलेनगर उपनगरकडून अशोकामार्गने वडाळा, पाथर्डी गावाकडे जाणारी वाहनेही पुणे- नाशिक मार्गाने द्वारका सर्कलवरून मुंबई आग्रा महामार्गाने पाथर्डी गावाकडे जात होत्या. तर काही वाहने पावसाच्या पाण्यात अडकून बंद पडल्याने रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक विस्तळीत झाली होती. 
 

Web Title: Wadala Pathardirod underwater; traffic flows

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.