मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

By Admin | Updated: March 2, 2015 00:08 IST2015-03-01T23:20:48+5:302015-03-02T00:08:27+5:30

मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

Visit to Malegaavi State Textile Secretary Porwal | मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

मालेगावी राज्य वस्त्रोद्योग सचिव पोरवाल यांची भेट

मालेगाव : राज्याच्या वस्त्रोद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी सायने येथील औद्योगिक वसाहत आणि डॉ. बळीराम हिरे हायटेक टेक्सटाइल क्लस्टरला भेट देऊन पाहणी केली.
मालेगाव शहर हे यंत्रमागाचे शहर असल्याने येथील औद्योगिक विकासासाठी राज्य शासनाचे सर्वोतोपरी सहकार्य असेल अशी ग्वाही पोरवाल यांनी याप्रसंगी दिली. मालेगाव क्लस्टरचे अध्यक्ष प्रसाद हिरे यांनी शहरातील वस्त्रोद्योगातील समस्या आॅडियो व व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे पोरवाल यांच्यासमोर मांडल्या.
तसेच या समस्या सोडविण्याची मागणी केली. येथील ११५ हेक्टरमध्ये होणाऱ्या वाढीव औद्योगिक वसाहतीसाठी एमआयडीसीमार्फत संयुक्त सांडपाणी उद्योग सुरू करण्याचे आश्वासन पोरवाल यांनी दिले. क्लस्टरमुळे येथे आॅटोलुम सुरू होऊन शहराचा कायापालट होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच मालेगावच्या वस्त्रोद्योगासंदर्भात लवकरच मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.
यावेळी राज्याचे उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र, एमआयडीसीचे मुख्य नियोजन अधिकारी लांडगे, विभागीय
अधिकारी रामदास खेडकर,
उद्योग केंद्राचे उमेशचंद्र दंडगव्हाळ, कार्यकारी अभियंता पाटील
यांच्यासह क्लस्टरचे संचालक प्रकाश कांकरिया, औद्योगिक वसाहतीचे सभापती अरुण भोसले, मनीष गांधी, झिया हकीम, मोमीन निहाल, वसी हकीम, साहिल कांकरिया, राजेंद्र सुराणा, खालिद अन्सारी आदिंसह यंत्रमाग उद्योजक, सूत व्यापारी व यंत्रमाग कामगार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Visit to Malegaavi State Textile Secretary Porwal