विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत तर आरती सिंह यांची अमरावतीला बदली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:05 PM2020-09-02T16:05:07+5:302020-09-02T16:40:48+5:30

नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार दोन वर्षांपुर्वी नांगरे पाटील यांनी रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून २ मार्च २०१९ स्विकारला होता.

Vishwas Nangre Patil was transferred to Mumbai and Aarti Singh to Amravati | विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत तर आरती सिंह यांची अमरावतीला बदली

विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत तर आरती सिंह यांची अमरावतीला बदली

googlenewsNext
ठळक मुद्देविशेष महानिरिक्षक छेरिंग दोरजे यांचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांची बदली सिंह यांच्या रिक्त पदावर अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही

नाशिक : मागील अनेक दिवसांपासुन नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीबाबतच्या सोशलमिडियावर जोरदार चर्चा सुरू होती. त्यांनी बदलीसाठी अर्ज केल्याचेही बोलले जात होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव पार पडताच मंगळवारी सुमारे ४५ अधिकाऱ्यांच्या बदलींच्या प्रस्तावावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदासुव्यवस्था विभागाच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त पदावर आयपीएस अधिकारी दीपक पांडे यांना संधी देण्यात आली आहे.


नाशिकच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार दोन वर्षांपुर्वी नांगरे पाटील यांनी रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडून २ मार्च २०१९ स्विकारला होता.

 

तसेच जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी नाशिकच्या पोलीस अधिक्षक पदाचा पदभार यांनीही गेल्या वर्षी २ मार्च रोजी संजय दराडे यांच्याकडून पदभार स्विकारला होता. सिंह यांची पदोन्नतीने अमरावतीच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे तर नांगरे पाटील यांची विनंती अर्जावरुन बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच नाशिकचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे यांचा कालावधी पुर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्तपदी नाशिक जिल्ह्याच्या बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र असलेले प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० मे २०१८ रोजी दोरजे यांनी पदभार स्वीकारला होता. सिंह यांच्या रिक्त पदावर अद्याप कोणतेही नाव निश्चित झालेले नाही.
 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

आपचा निलंबित नगरसेवक ताहिर हुसेनला ईडीने केली अटक

 

आईने व्हर्जिन मुलीसोबत शरीरसंबंधासाठी लावली बोली आणि केला इतक्या लाखांचा सौदा  

Web Title: Vishwas Nangre Patil was transferred to Mumbai and Aarti Singh to Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.