बाधित रुग्ण आढळल्याने आज विंचूर बंदचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 19:36 IST2020-06-25T19:36:11+5:302020-06-25T19:36:38+5:30
विंचूर : येथे एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने ग्रामपालिकेच्या वतीने सदर परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला आहे. दरम्यान, उद्या (दि. २६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. गावात पुन्हा बाधित रु ग्ण आढळल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाधित रुग्ण आढळल्याने आज विंचूर बंदचे आवाहन
येथील रहिवाशी व रेल्वे खात्यात सेवेत असलेली ४४ वर्षीय व्यक्ती कल्याण येथे वास्तव्यास आहे. सदर व्यक्तीची प्रकृती पाच सहा दिवसांपूर्वी बिघडल्याने मंगळवारी (दि.२३)विंचूर येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. रु ग्णामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यास जिल्हा रु ग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले होते. गुरुवारी (दि. २५) त्या व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबातील आई, वडील, पत्नी, मुलगा व मुलगी अशा पाच व्यक्तींना येथील कर्मवीर विद्यालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. विंचूर ग्रामपालिकेच्या वतीने रु ग्णाच्या घराजवळील १०० मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून सील करून जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. तसेच उद्या (दि.२६) विंचूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यापासून काही नागरिक विना मास्क बिनधास्त फिरत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. पंधरा दिवसांपूर्वी विंचूर कोरोना मुक्त झाले होते. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. परंतु गुरुवारी आढळलेल्या बाधित रु ग्णामुळे नागरीकांमध्ये पुन्हा एकदा भितीचे वातावरण पसरले आहे.