गावठी पिस्तुल बाळणाऱ्यास संशयिताविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 18:04 IST2018-11-17T18:04:25+5:302018-11-17T18:04:47+5:30

नाशिक : गावठी कट्टा सोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़ सिध्देश मनोज जोंधळे (२५, रा.तारा निवास,स्वामीनगर टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

 The villain pistol is a crime against the suspect | गावठी पिस्तुल बाळणाऱ्यास संशयिताविरोधात गुन्हा

गावठी पिस्तुल बाळणाऱ्यास संशयिताविरोधात गुन्हा

ठळक मुद्दे हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल

नाशिक : गावठी कट्टा सोबत घेऊन फिरणाºया संशयितास अंबड पोलिसांनी गुरुवारी (दि़१५) सायंकाळी सापळा लावून अटक केली़ सिध्देश मनोज जोंधळे (२५, रा.तारा निवास,स्वामीनगर टाकळीरोड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पाथर्डीफाटा परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एक संशयित गावठी पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती अंबड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित जोंधळे यास अटक केली़ त्याची झडती घेतली असता लोखंडी बनावटीचे गावठी पिस्तुल आढळून आले़

या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  The villain pistol is a crime against the suspect