शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्यांचे कर्ज माफ केले

By admin | Updated: November 19, 2016 00:05 IST

आता माझेही करा,सफाई कामगाराचे स्टेट बॅँकेला साकडे

नाशिक : भारतीय स्टेट बॅँकेने उद्योगपती विजय मल्ल्या यांचे १२०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले, मी एक गरीब माणूस असून, सफाई कामगार आहे. त्यामुळे माझेही कर्ज याच धोरणानुसार माफ करावे, अशी मागणी त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत काम करणाऱ्या भाऊराव सीताराम सोनवणे या कर्मचाऱ्याने स्टेट बॅँकेच्या त्र्यंबकेश्वर शाखेकडे केली आहे.देशातील सर्वात मोठी बॅँक असलेल्या स्टेट बॅँक आॅफ इंडियाने देशातील ६३ बड्या उद्योगपतींचे सात हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. त्यात विदेशात पळून गेलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्या यांचा समावेश असून, त्यांचे एक हजार २०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. लोकमतच्या या बातमीचा संदर्भ घेऊनच त्र्यंबकेश्वर येथील या सफाई कामगाराने स्टेट बॅँकेत हे पत्र दिले आहे. भाऊराव सोनवणे याने आपल्या मुलाच्या आजारपणासाठी दीड लाख रुपयांचे कर्ज काढले आहे. तीन वर्षे मुदतीचे हे कर्ज आहे. यासंदर्भात बॅँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, भारतीय स्टेट बॅँक यांनी वैयक्तिक कर्ज उद्योगपती विजय मल्ल्या यांना भारतीय स्टेट बॅँकेचे असलेले १२०१ कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचे लोकमत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे, ही बाब अत्यंत चांगली आहे. तरी मी आपणास विनंती करतो की, मी एक गरीब घरातील असून, नगर परिषदेत सफाई कामगार या पदावर काम करतो. ज्या अर्थी आपली बॅँक मोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करते, त्याचप्रमाणे माझे दीड लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज त्याच धोरणानुसार माफ करावे, ही विनंती असे नमूद करण्यात आले आहे. सोशल मीडियावरून हे पत्र व्हायरल झाले असून, सरकारचा उद्योगपतींना कर्जमाफी देण्याचा निर्णय आता सामान्यांना लागू करावा अशी टिप्पणी त्यावर होत आहे. (प्रतिनिधी)