पशुवैद्यकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

By Admin | Updated: December 28, 2014 00:51 IST2014-12-28T00:49:31+5:302014-12-28T00:51:20+5:30

: विजयश्री चुंबळे सोेव्हियर २०१४ कार्यशाळा

Veterinarians should use modern technology | पशुवैद्यकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

पशुवैद्यकांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे

नाशिक : राज्यातील पशुवैद्यकीय क्षेत्रात कार्यरत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी या क्षेत्रातील आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाबाबत माहिती आत्मसात करून त्याचा वापर पशुपालकांचे पशुधन वापरण्यासाठी करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी केले. यशवंतराव चव्हाण कृषी विज्ञान केंद्र व इंडियन सोसायटी फॉर व्हेर्टनरी सोसायटी नाशिक चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीत दोन दिवसीय ‘सोव्हियर २०१४’ या तांत्रिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे उद््घाटन जि. प.अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर, विभागीय सहसंचालक डॉ. एस. पी. सावंत आदि उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी शेतकऱ्यांचे पशुधन कसे महत्त्वाचे असते. त्यासाठी पशुवैद्यकांनी नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांच्यावर उपचार करून पशुधन वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. उद््घाटनानंतर मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. गायकवाड, परभणी येथील प्राचार्य डॉ. व्ही. डी.अहेर तसेच फलटन येथील संशोधन केंद्राचे प्राचार्य डॉ. प्रदीप घळसासी यांनी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत मुंबई. पुणे, बीड व औरंगाबाद येथील संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले आहते. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे समन्वयक डॉ. ए. एम. केळकर, सह समन्वयक डॉ. एस.व्ही. तुबांरे, खचिनदार डॉ. एम. एम. ठाकूर, सहसचिव डॉ. सचिन वेंदे, डॉ. पी. एस. महाजन, डॉ. आर. व्ही. चांदोरे आदि परिश्रम घेत आहेत.

Web Title: Veterinarians should use modern technology