शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीदारांसमोर वाजले ढोल

By admin | Updated: April 1, 2016 00:02 IST

सातपूर विभागाची कामगिरी : पंचवीस वर्षांत प्रथमच उद्दिष्टपूर्ती

गोकुळ सोनवणे सातपूरमहापालिकेची थकबाकी वसुलीसाठी विशेष पथक स्थापन करून, ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून आणि थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल- ताशाचा गजर करीत गेल्या पंचवीस वर्षांत प्रथमच विक्रमी वसुली करून उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न मनपाच्या सातपूर विभागीय कार्यालयाने केला आहे. मात्र २५ बंद कारखान्यांकडे असलेली जवळपास ९० लाख रुपयांची थकबाकी वसूल करण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.महापालिकेने सर्वप्रथम प्रत्येक मिळकतधारकास देयके वेळेवर देण्याचा प्रयत्न केला. वॉरंट, सूचना पत्र पाठविले. ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करण्यात आले. त्यानंतर पाच अधिकाऱ्यांचे एक वसुली पथक तयार केले. या पथकाला दररोजचे वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या पथकाच्या माध्यमातून जप्ती मोहीम सुरू केली. या मोहिमेत एक कंपनी, सहा गाळे आणि एक दुकान सील केले. मात्र काही बडे थकबाकीदार दाद देत नव्हते. म्हणून सोसायट्या आणि अपार्टमेंटच्या दारावर यादी चिकटवली. शिवाय आनंदवली आणि गंगापूर रोडवरील बड्या त्रासदायक थकबाकीदारांच्या घरापुढे वसुली ढोल-ताशे पथक पाठविल्याने बदनामीच्या भीतीने ही थकबाकी वसूल झाली आहे. या सर्व उपाययोजनांमुळे मागील वर्षापेक्षा पाणीपट्टी आणि घरपट्टीत तब्बल दोन कोटी रु पयांची वाढ झाली आहे. (वार्ताहर)