शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:43 AM

मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

नाशिक : मंगळवारी आलेल्या कार्तिकी पौर्णिमेनिमित्ताने साजरी होणारी देवदिवाळी, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरांमध्ये दीपोत्सव तसेच भगवान कार्तिकेयाच्या जन्मोत्सवानिमित्त नाशकात मंगळवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.हिंदू संस्कृतीमध्ये कोजागरी पौर्णिमेप्रमाणे कार्तिकी पौर्णिमेलाही महत्त्व असते. या दिवशी स्नान करून भगवान कार्तिकेच्या दर्शनाला अत्यंत महत्त्व असल्याचे मानले जाते. वर्षभर महिलांना दर्शन न दिले जाणाऱ्या भगवान कार्तिकेच्या मंदिरात एक दिवसासाठी महिलांना दर्शन खुले असते. कार्तिक मासात येणाºया पौर्णिमेच्या तिथीला त्रिपुरारी पौर्णिमा, असेही संबोधले जाते. ही त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे दिवाळी सणाचा उत्तरार्ध असते. या पौर्णिमेला कार्तिक पौर्णिमा असे म्हणतात. याच दिवशी देवदिवाळी हा सणदेखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने खडतर तप करून ब्रह्मदेवाकडून शत्रूंपासून भय राहणार नाही, असा वर मागून घेतला या वरामुळे उन्मत्त होऊन तो सर्व लोकांना व देवांनासुद्धा खूप त्रास द्यायला लागला. त्रिपुरासुराची तीन नगरे असून, त्याला अभेद्य तट होता. त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना. देवांनी भगवान शंकराची अखेर प्रार्थना केली. तेव्हा शंकरांनी त्याची तिन्ही नगरे जाळून त्याला ठार केले. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ही घटना घडल्यामुळे तिला त्रिपुरारी पौर्णिमा म्हटले जाऊ लागले. या दिवशी घरात, घराबाहेर व देवळातही दिव्यांची आरास करून पूजा केली जाते, तसेच नदीत दीपदान करून लोक आनंदोत्सव साजरा करतात. या दिवशी भगवान शंकर, पार्वती आणि कार्तिकेय व श्रीगणेशाची पूजा करावी, असे केल्यास घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, अशीदेखील श्रद्धा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सामान्य आकाराहून अधिक मोठा दिसतो. ज्योतिष शास्त्रात चंद्र हा मनाचा कारक ग्रह समजला जातो.  त्यामुळे या दिवशी चंद्राचे दर्शन अधिक शुभ आणि मन प्रसन्न करणारे असल्याचे मानले जाते.त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असल्याने त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो, असे म्हणतात. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्याला कारभार सोपवतात व स्वत: कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात अशी श्रद्धा आहे. या दिवशी ‘हरिहर भेट’ म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते, असे मानले जाते. या दिवशी शंकराची नावे घेऊन आणि विष्णूचे सहस्रनाम घेऊन बेल आणि तूळस वाहून पूजा केली जाते. विविध मंदिरांमध्ये तसेच अनेक कुटुंबांमध्येही ही पूजा केली जाते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला हिंदूंची दोन पवित्र तत्त्वे शिव व विष्णू यांची मध्यरात्री भेट होते. म्हणून त्यावेळी बेल व तूळस वाहून त्यांची पूजा करतात. या दिवशी घरोघरी, अंगणात, मंदिरात दिवे लावण्याची पद्धत आहे.दीपोत्सव सोहळाकार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषत: शिवमंदिरातून त्रिपूर वाती लावतात. महाराष्ट्रातील अन्य सर्व मंदिरे अशा तºहेने उजळून निघतात, जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, विविध देवस्थानात जे दीपस्तंभ असतात ते सुद्धा प्रकाशमान होऊन झळाळतात. महादेव मंदिरांमध्ये भाविक दीप लावून उत्सव साजरा करतात. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिकTempleमंदिर