शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

By admin | Updated: September 29, 2014 00:05 IST

वडनेरभैरवला जोगेश्वरी माता उत्सव

वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील वडनेरभैरव येथील कुलस्वामींनी जोगेश्वरी मातेचा शारदीय नवरात्र उत्सव सलादेबाबा जोगेश्वरी दत्तमंदिरात घटस्थापनेपासून सुरू झाल्याची माहिती नाशिक जिल्हा कुलस्वामिनी जोगेश्वरी माता भक्तमंडळाच्या वतीने दिली आहे. नाशिक जिल्ह्यातील जाधव, पानगव्हाणे, शेटे, पाचोरकर, सलादे, रसाळ, कावळे यांसह अनेक परिवारांची कुलदेवता असलेल्या जोगेश्वरी मातेचा नवरात्र उत्सव सुरू झाला. वडनेरभैरव सिद्धिविनायक पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप जाधव व सौ. जाधव यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. यावेळी चांदवड पंचायत समिती उपसभापती मनीषा जाधव यांच्या उपस्थितीत महाआरती झाली. याप्रंसगी डॉ. विक्रम सलादे, नाशिक जनकल्याण सह. बॅँकेचे संचालक पंढरीनाथ पाचोरकर, भैरवनाथ ट्रस्टचे सरचिटणीस सुरेश सलादे, भैरवनाथ ट्रस्टचे संचालक अनिल पवार, आंनदराव साळुंके उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा बेलवृक्ष देऊन सत्कार डॉ. विक्रम सलादे यांच्या हस्ते झाला. विजयादशमीपर्यंत दररोज दुर्गासप्तशती, स्त्रोत्रपठण, कुंकमार्चन, सायंकाळी महाआरती असा कार्यक्रम होणार आहेत, तर कोजागिरी पौणिमेला जोगेश्वरी नवचंडी होमहवन होऊन कार्यक्रमाची सांगता होईल पौरोहित्य दीपक मधुकर जोशी हे करीत आहेत. (वार्ताहर)