भुयारी पादचारी मार्गाचा वापर बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:15 AM2019-11-21T00:15:32+5:302019-11-21T00:16:04+5:30

महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही.

  Use the subway route closed | भुयारी पादचारी मार्गाचा वापर बंदच

भुयारी पादचारी मार्गाचा वापर बंदच

Next

नाशिक : महानगराच्या परिघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका अंडरपाससह अन्य तीन अंडरपास पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात राष्टय महामार्ग प्राधिकरणाला आतापर्यंत यश मिळू शकलेले नाही. त्यामुळे द्वारकासह अन्य तिन्ही अंडरपास ओलांडताना रस्ता क्रॉसिंग करणाऱ्यांना वाचवताना वाहनचालकांची अक्षरश: तारांबळ उडते. काही ठिकाणी तर वाहनचालकांचे किरकोळ अपघात होण्याचे प्रकारदेखील घडत आहेत.
महानगरातील सर्वाधिक रहदारीचा आणि त्यामुळे पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सदैव गजबजलेला द्वारकाच्या परिसरात पादचाºयांच्या सोयीसाठी २०१३ साली अंडरपास बांधण्यात आला. मात्र, तब्बल ६ वर्षे उलटून गेली तरी अंडरपासचा प्रभावीपणे वापर होत नसल्याचे चित्र कायम राहिले. द्वारकाचा हा अंडरपास शहरात सर्वात मोठा असूनही गत सहा-सात वर्षांमध्ये त्याच्या वापराबाबत काहीच प्रगती झालेली नाही. या अंडरपासचा एक भाग द्वारका हॉटेलजवळील सर्व्हिस रोडवर खुला आहे, दुसरा भाग पूर्वीच्या मंदिराजवळ, तिसरा भाग द्वारका पोलीस चौकीजवळ, चौथा भाग गोदावरी हॉटेलजवळ तर अमरधामकडे जाणाºया रस्त्यालगतच्या पाचव्या ठिकाणावरही अंडरपासचा मार्ग खुला आहे. मात्र, इतके पाच प्रवेश असूनही तेवढी माणसेदेखील या अंडरपासमधून रस्ता ओलांडत नाहीत. सायंकाळनंतरच्या वेळी तर बहुतांश प्रवेशद्वारांनजीक गर्दुल्ले या अंडरपासचा आसरा घेत असल्याने त्या भागातून जाणे अधिक धोकादायक ठरू लागले.
त्यातून एखादा अनर्थ घडू नये म्हणून दोन वर्षांपूर्वी काही काळ अंडरपास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पंचवटी कॉलेजसमोर असलेल्या अंडरपासबाबत कमी-अधिक प्रमाणात तशीच स्थिती आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाºयांनी द्वारकासह असे चार अंडरपास सुरू करण्याबाबत दोन महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्वरित लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत नाशिकच्या परिघातील चारही अंडरपास प्रभावीपणे कार्यान्वित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बोगद्यात अंधार
महामार्ग प्राधिकरणच्या वतीने सीसीटीव्ही, लाइट्सह अन्य सुविधा पुरविण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. मात्र बोगद्यात रात्रीच्या वेळी अंधार असतो. तसेच नियम मोडत महामार्गावरूनच रस्ता ओलांडणाºयांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रत्येक अंडरपासला दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला होता. मात्र, त्याबाबत पुढे कोणतीच हालचाल झालेली नसल्याने अंडरपासची अवस्था ‘जैसे थे’ आहे.
वाहनांचे होतात अपघात
द्वारका परिसरात वाहनांबरोबर पादचाºयांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे द्वारकाच्या चौकासह त्याच्या बाजूने रस्ता ओलांडणाºयांचे प्रमाण खूप अधिक आहे. अशाप्रकारे रस्ता ओलांडणारे गडबडीत रस्ता ओलाडताना रस्त्यावरून जाणाºया दुचाकी, चारचाकी वाहनचालकांना चुकवताना अपघात होण्याचे प्रकारदेखील वाढले आहेत.
चौकामध्ये वाहनांचा वेग कमी असल्याने जीवघेणे अपघात घडत नाहीत. मात्र, दुचाकीचालक पडण्यासह त्यांना दुखापत होण्याचे प्रकारदेखील सातत्याने घडत आहेत. त्यामुळे हे अंडरपास लवकरात लवकर प्रभावीपणे कार्यान्वित करण्याची गरज असल्याचा सूर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
दिवे फुटलेले
द्वारकासह बहुतांश अंडरपासमधील गेट तुटलेले, भंगार म्हणून गर्दुल्ल्यांनी मिळेल तसे उचकटून नेलेल्या अवस्थेत आहेत. तर अनेक ठिकाणी लोखंडी जाळ्या उचकटून आणि दिव्यांच्या काचा फोडून आतील बल्ब गायब केलेले आहेत. त्याशिवाय पान, बार, गुटख्यांचे ढीग जागोजागी विखुरलेले असल्याने त्या रस्त्याने महिलांनाच नव्हे तर सामान्य पुरुषांनादेखील जाणे त्रासदायक ठरते, अशीच त्यांची अवस्था आहे. याबाबत कारवाईची मागणी होत आहे.

 

Web Title:   Use the subway route closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.