शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

जवानांच्या बनावट ओळखपत्रांचा वापर;भामटे घालतायेत लाखोंना गंडा

By अझहर शेख | Published: September 22, 2019 1:00 PM

नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा, यासाठी भारतीय सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने बनावट कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून तयार करून त्याचा सर्रास वापर करतात.

ठळक मुद्देदोन महिन्यांत दहा ते पंधरा घटनागुगल-पे, फोन-पेद्वारे रक्कम प्राप्त करून घेत फसवणूकस्मार्टफोनचा 'स्मार्ट'पणे वापर करण्याची गरजबॅँकींग अ‍ॅप्लिकेशनच्या वापराबाबतच्या अज्ञानाचा फायदा

अझहर शेख, नाशिक : जुन्या वस्तूंची आॅनलाइन खरेदी-विक्रीचे माध्यम असलेल्या 'ओएलएक्स' संकेतस्थळाचा भामट्यांनी फसवणूकीसाठी आधार घेतला आहे. या संकेतस्थळावर भामटे थेट लष्करी जवानांच्या नावाचा वापर करत अन्य शहरात 'पोस्टिंग' झाल्याचे सांगून महागडे मोबाइल, वाहने, घरगुती वस्तूंच्या विक्रीचे आमिष फसव्या जाहिरातींमधून दाखवत लाखो रूपयांना गंडा घालत आहेत. राज्यातील सर्वच शहरांमध्ये अशा स्वरूपांचे गुन्हे घडविणारी आंतरराज्यीय टोळी सक्रीय असून नागरिकांनी 'ओएलएक्स'वरील जाहिरातींपासून सावध होत आॅनलाइन आर्थिक व्यवहार टाळण्याची गरज आहे.आॅनलाइन फसवणूकीचे विविध फंडे आंतरराज्यीय टोळीचे गुन्हेगार वापरत असून ओएलएक्ससारख्या जुन्या वस्तू खरेदी-विक्रीच्या संकेतस्थळाचा या टोळीने आधार घेतल्याचे अनेक गुन्ह्यांमधून समोर आले येत आहे. नाशिकमध्ये अशाच प्रकारे या दोन महिन्यांत दहा ते पंधरा घटना घडल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. स्वस्त: दरात जुन्या वस्तू विक्रीचे आमिष ओएलएक्सवरून भामट्यांकडून दाखविले जाते. यासाठी भामटे विविधप्रकारे आपले भ्रमणध्वनी क्रमांक बदलून नागरिकांना जाळ्यात अडकवतात. नागरिकांचा विश्वास संपादन करता यावा, यासाठी भारतीय सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने बनावट कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून तयार करून त्याचा सर्रास वापर करतात. त्याद्वारे नागरिकांची खात्री झाल्यानंतर आॅनलाईन पध्दतीने गुगल-पे, फोन-पेद्वारे रक्कम प्राप्त करून घेत फसवणूक करण्याचा स्मार्ट फंडा या परराज्यातील गुन्हेगारांनी शोधला आहे.

शहरांमधील लष्करी केंद्राच्या नावांचा वापरनाशिकमध्ये असलेल्या देवळाली कॅम्प, नाशिकरोड येथील विविध लष्करी केंद्रांच्या नावाचा सर्रास वापर करत भामटे स्वत:ला जवान असल्याचे सांगून अन्य राज्यांत ह्यपोस्टिंगह्ण झाल्याचे कारण पूढे करून नागरिकांची वस्तू खरेदी-विक्रीच्या माध्यमातून फसवणूक करत आहेत. अशाचप्रकारे अन्य शहरांमध्येसुध्दा तेथील स्थानिक लष्करी केंद्रांच्या नावांचा इंटरनेटवरून माहिती काढत गुन्हेगारांकडून फसवणूकीसाठी वापर केला जात आहे.
तोट्याचा व्यवहार कोणीही करत नाही...ओएलएक्सवरून जुन्या वस्तूंची खरेदी करताना अधिक सतर्कता बाळगावी. सैन्यदलाच्या जवानांच्या नावाने ओएलएक्सवर झळकणाऱ्या जाहिराती फसव्या व बनावटदेखील असू शकतात. जाहिरातींमधील आमिषाला बळी पडू नये. स्वत:चे आर्थिक नुकसान पत्कारून तोट्याचा व्यवहार कोणीही करत नाही, हे नागरिकांनी विसरू नये. कुठल्याहीप्रकारे आॅनलाइन आर्थिक व्यवहार नागरिकांनी आमिषाला बळी पडून करू नये,असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.जागो ग्राहक जागो...ओएलएक्सचा आधार घेत नागरिकांना गंडविणा-या भामट्यांची टोळी केवळ नाशिक,अहमदनगर, पुणे, नागपूर, सोलापूर या शहरांपुरतीच मर्यादित नाही तर देशभरातील विविध राज्यांमध्ये अशा पध्दतीने गुन्हे घडत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांमागे आंतरराज्यीय टोळी असण्याची शक्यता वाढली आहे. नागरिकांनी आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जागरूक ग्राहकाची भूमिका बजवावी.--- असा घालतात गंडाआॅनलाइन वस्तू विक्री करणाऱ्यांचा शोध ओएलएक्सवरून भामट्यांकडून घेतला जातो. त्यांना स्वत:ची ओळख आर्मी आॅफिसर अशी सांगतात. ओळख खरी असल्याची खात्री पटावी, यासाठी जवानांच्या नावाने तयार केलेले बनावट ओळखपत्र, छायाचित्रे ते व्हॉटस्अ‍ॅपद्वारे संबंधित नागरिकाला पाठवितात. त्यानंतर विश्वास अधिक निर्माण व्हावा म्हणून पाचशेच्या आत रक्कम आॅनलाईन पध्दतीने हे भामटे समोरील व्यक्तीला आर्थिक व्यवहारांच्या अ‍ॅप्लिके शन्सचा वापर करून लिंक पाठवितात. व्यक्ती जेव्हा स्वताचा त्याच्या खात्यात ती रक्कम जमादेखील होते. त्यानंतर खरेदीदाराला समोरील व्यक्ती अस्सल असून ती फसवणूक करणारी नाही, याची खात्री पटते आणि मग संवाद वाढवून भामटे हजारो ते लाखोंचा व्यवहार करतात. दरम्यान, व्यवहाराची मोठी रक्कम मिळविण्यासाठी भामटे पुन्हा संबंधित ग्राहकाच्या मोबाईलवर ह्यमनी रिक्वेस्टह्णची लिंक पाठवितो; परंतू लिंकसोबत असलेल्या 'नोट'मध्ये बदल ते चतुराईने करतात. लिंक पैसे येण्याची आहे की जाण्याची आहे, हेच कळत नाही. जेव्हा नागरिक त्या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्या्रच्या बॅँक खात्यातून तेवढी रक्कम भामट्याच्या बॅँक खात्यात जमा झालेली असते.
देशभरात अशा स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. सैन्याच्या जवानांचे बनावट ओळखपत्र तयार करून भामटे ओएलएक्सवरून गंडा घालतात. नागरिकांनी सावध राहून प्रत्यक्ष भेट घेऊनच खात्री करून व्यवहार करावा. आंतरराज्यीय टोळी या गुन्ह्यांमागे असण्याची शक्यता असून त्या दिशेने तपास सुरू आहे.-देवराज बोरसे, पोलीस निरिक्षक, सायबर पोलीस ठाणे

आॅनलाइन फसवणूकीच्या गुन्ह्यात भामट्यांकडून कु ठल्याहीप्रकारे माहिती 'हॅक' केली जात नाही. केवळ नागरिकांच्या स्मार्टफोन आणि बॅँकींग अ‍ॅप्लिकेशनच्या वापराबाबतच्या अज्ञानाचा फायदा घेतला जातो. नागरिक आमिषाला बळी पडतात अणि भामटे सर्रासपणे खोटे बनावट ओळखपत्र, छायाचित्रांचा वापर करत सहज नागरिकांच्या खात्यातून त्यांच्या खात्यात केवळ एका क्लिकद्वारे रक्कम वर्ग करून घेतात. त्यामळे नागरिकांनी स्मार्टफोनचा 'स्मार्ट'पणे वापर करण्याची गरज आहे. बॅँकिंग व्यवहाराबाबतचे अ‍ॅप्लिकेशन सर्वच सुरक्षित आहे, असे सांगणे कठीण आहे.-तन्मय दिक्षित, सायबर तज्ज्ञ

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयcyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजी