शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

गंगापूर धरणातून वाढीव पाणी आरक्षणासाठी नाशिक महापालिकेचा आग्रह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 2:55 PM

उद्या आढावा बैठक : दारणातील आरक्षण वर्ग करण्याची मागणी

ठळक मुद्देगंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविली गेल्या वर्षी गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती

नाशिक : यंदा वरुणराजाच्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या  गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा असल्याने महापालिकेने सन २०१७-१८ या वर्षासाठी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी जलसंपदा खात्याकडे नोंदविलेली आहे. दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षणापैकी सन २०१६-१७ मध्ये महापालिकेने केवळ ३०२ दलघफू पाणी उचलल्याने यंदा ३०० दलघफू पाणी आरक्षणाचीच मागणी करण्यात आलेली आहे. गुरुवारी (दि.२) जिल्हाधिकाऱ्याकडे होणाऱ्या  पाणी आरक्षणाच्या संदर्भात आयोजित आढावा बैठकीत दारणातील पाणी आरक्षण कमी करुन ते गंगापूर धरणातून वाढवून देण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.महापालिकेने गेल्या वर्षी दि. १५ आॅक्टोबर २०१६ ते ३१ जुलै २०१७ या कालावधीसाठी गंगापूरमधून ४२०० दलघफू तर दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली होती परंतु, जलसंपदा खात्याने गंगापूरमधून ३९०० तर दारणातून ४०० दलघफू पाणी आरक्षणाला मान्यता दिली होती. महापालिकेने २९० दिवसांत पाणीपुरवठ्याचे काटेकोर नियोजन करत प्रतिदिन १४.७३ दलघफू पाणी उचल लक्षात घेता ३१ जुलैपर्यंत गंगापूर धरणातील पाण्याचा पूर्णपणे वापर केला होता. तर दारणा धरणातून ४०० दलघफू पैकी ३०२ दलघफू इतकीच पाण्याची उचल करण्यात आली होती. महापालिका दारणा धरणातून नाशिकरोड भागासाठी पाण्याची उचल करत असते परंतु, दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता दारणा धरणातून ३०० दलघफूच्या वर पाण्याची उचल करता येत नाही. तांत्रिक दृष्टया पाणी उचल करण्यात अडचणी येत असल्याने दारणातील पाणी आरक्षण कमी करण्याची मागणी महापालिकेने यापूर्वी वारंवार जलसंपदा विभागाकडे केलेली आहे. सन २०१५ पर्यंत महापालिकेला दारणा धरणातून ५०० दलघफू पाणी आरक्षण मिळत आले आहे. परंतु, सन २०१५-१६ मध्ये पाणीप्रश्न पेटल्यानंतर जलसंपदा विभागाने दारणातील पाणी आरक्षण १०० दलघफूने घटवत ४०० दलघफू वर आणले होते. मात्र, गेल्या वर्षभरात ३०२ दलघफू पाण्याचीच उचल करणे महापालिकेला शक्य झाले. दारणातील पाणी उचलण्याची क्षमता लक्षात घेऊन महापालिकेने आता सन २०१७-१८ या वर्षासाठी दारणातून ३०० दलघफू पाणी आरक्षणाची मागणी केली असून त्याऐवजी गंगापूर धरणातून ४३०० दलघफू पाण्याची मागणी नोंदविण्यात आलेली आहे. यंदा गंगापूर धरणासह समुहात मुबलक पाणीसाठा असल्याने जलसंपदा विभागाकडून महापालिकेची मागणी मान्य केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गंगापूर धरण समुहात ९९ टक्के साठाशहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ३० आॅक्टोबर २०१७ अखेर ५५०० दलघफू म्हणजे ९८ टक्के पाणीसाठा झालेला आहे. गंगापूर धरण समुहातील काश्यपी धरणात १८४१ दलघफू (९९ टक्के), गौतमी गोदावरी १८५६ दलघफू (९९ टक्के) तर आळंदी धरणात ९७० दलघफू (१०० टक्के) पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समुहात एकूण १०१६७ दलघफू (९९ टक्के) पाणीसाठा आहे तर दारणा धरणात ७१४९ दलघफू म्हणजे शंभर टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरणातील पाणी उचलण्यास येणाºया मर्यादा लक्षात घेता दारणातील वाढीव पाणी आरक्षणाचा महापालिकेला काहीच फायदा होत नाही. त्यामुळे गंगापूरमधूनच पाणी आरक्षण वाढविण्याचा आग्रह महापालिकेकडून धरला जाणार आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी