शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

उर्दूचा गोडवा : शायर, साहित्यिकांकडून ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ची स्थापना

By admin | Updated: March 3, 2015 00:36 IST

विस्तारणार उर्दू साहित्याचे अवकाश

  नाशिककविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव असा लौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये आता उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार आहे. शहरासह जिल्ह्यातील उर्दू कवी (शायर), साहित्यिकांनी एकत्र येऊन उर्दू साहित्याशी संबंधित अशा ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली असून, आता नाशिककरांना उर्दू साहित्याचा गोडवा मुशायरासारख्या मैफलीतून अनुभवता येणार आहे.ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या शहराला साहित्य-सांस्कृतिक वारसा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेवरही बहुसंख्य नाशिककर प्रेम करतात. मराठी, हिंदी भाषांच्या विकासासाठी तसेच या भाषांमधील दिग्गज साहित्यिकांचे साहित्य, विचार नागरिकांपर्यत पोहचावेत यासाठी मराठी-हिंदी काव्यसंमेलने, व्याख्याने आयोजित केले जातात. उर्दू मुशायरा, गझल मैफली अपवादानेच आयोजित केल्या जातात. या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात उर्दू कवी संमेलन (मुशायरा), गझलीच्या मैफली, उर्दू शायरीचा विकासाबाबत उर्दू शिकणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आदि उपक्रम राबविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शायर रईसा खुमार यांनी दिली आहे. एकूणच गुलशनाबादेत उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार असून, या भाषेमधील गोडव्याचा आनंद नाशिककरांना वेळोवेळी लुटता येणार आहे. उर्दू साहित्य चळवळीची जोपासना तसेच उर्दू भाषेमधील अर्थपूर्ण शायरी नागरिकांना ऐकावयास मिळणार आहे. (वार्ताहर)