शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या

By admin | Updated: September 21, 2014 00:41 IST

बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या

नाशिक : मतदार यादीत नाव आहे परंतु राहत्या पत्त्यावर न आढळून येणाऱ्या मतदारांबरोबरच ज्यांनी स्थलांतर केले व मयत झाले अशा मतदारांचा घरोघरी जाऊन शोध घेऊन त्यांच्या नावापुढे शिक्का मारून मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. एकीकडे यादीतून मतदारांची नावे वगळायची नाहीत, तर दुसरीकडे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या निर्णयामुळे बोगस मतदान टाळणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत पत्त्यावर न आढळून आलेल्या लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली होती. परिणामी मतदार यादीत नाव नसल्याच्या कारणास्तव मोठा गजहब होऊन अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले व प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचून आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. या सर्व गोष्टींची दखल घेत आयोगाने पुन्हा मतदार नोंदणी राबविलीच; परंतु स्थलांतरित, दुबार वा मयत मतदारांची नावे स्वत:हून कमी न करता ती यादीत आहेत तशीच राहू देण्याच्या सूचना सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीबरोबरच ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी व नुकत्याच राबविण्यात आलेल्या मोहिमेत नावनोंदणी केलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत नाव असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे; परंतु असे असतानाही बोगस मतदान होऊ नये म्हणून आयोगाने केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे ठरविले आहे. केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागनिहाय मतदार याद्यांची फोड करून दिली जाणार असून, हे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री करतील. त्यात प्रामुख्याने घरी गैरहजर असलेले मतदार, स्थलांतरित झालेले मतदार व मरण पावलेले मतदार अशा प्रकारे त्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. मतदार यादीवरच मतदाराच्या नावासमोर केंद्रस्तरीय अधिकारी खूण करतील व त्यानंतर मूळ मतदार यादीत प्रत्येक मतदारासमोर तसा शिक्का मारण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांना चटकन ते निदर्शनास येऊन स्थलांतरित मतदार मतदानासाठी आला तर त्याची विचारपूस करणे सुलभ होणार आहे. याचबरोबर मयत मतदारांच्या नावापुढे शिक्का असल्याने त्यांच्या नावे बोगस मतदान टाळता येणार आहे. (प्रतिनिधी)