निर्विघ्नोत्सव?

By Admin | Updated: September 10, 2016 01:06 IST2016-09-10T01:06:06+5:302016-09-10T01:06:17+5:30

उघड्यावर वायर्स, अग्निरोधक उपाययोजना शून्य

The uninterrupted festival? | निर्विघ्नोत्सव?

निर्विघ्नोत्सव?

नाशिक : सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे दरवर्षी वाढतच चाललेले प्रमाण पाहता हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडत असताना त्यातील धार्मिकता, पावित्र्यता टिकवून ठेवण्याची जबाबदारी साऱ्यांचीच आहे, परंतु या उत्साहाच्या भरात नेमके त्याकडे दुर्लक्ष केले जाते. तसे होऊ नये म्हणून पोलीस यंत्रणेकडून काही मार्गदर्शक तत्त्वे, सूचना सार्वजनिक मंडळांना दिल्या जातात. त्यामागचा हेतू चांगला असला तरी, त्या सूचनांचे पालन करण्यास मंडळे फारसे उत्सूक नसतात, परिणामी एखादी घटना, दुर्घटना घडल्यास संपूर्ण उत्सवाच्या उत्साहावर विरजन पडते. यंदा ठिकठिकाणी साजरे होत असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मित्रमंडळांनी निर्विघ्न उत्सव पार पाडण्यासाठी काय काय काळजी घेतली आहे याची पाहणी ‘लोकमत चमू’ने केली.

Web Title: The uninterrupted festival?