Two-wheeler thieves fleeing from the mangalsutra of the woman | महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांचा पळ

महिलेचे मंगळसूत्र ओरबाडून दुचाकीस्वार चोरट्यांचा पळ

ठळक मुद्देसिडकतील शिवशक्ती चौकात महिलेचे मंगळसूत्र खेचलेदुचाकीवरून आलेल्या चोरट्यांकडून भरदिवसा चोरी

नाशिक  : शिवशक्ती चौकातून जात असताना  महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा सुरेंद्र कोतकर यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. मनीषा कोतकर या दुपारी दोन वाजेच्या सुमारास दुचाकीवरून शिवशक्ती चौकातून जात असताना पाठीमागून एका काळ्या रंगाच्या पॅशन गाडीवरून हेल्मेट घालून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळयाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. कोतकर यांनी लगोलग चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या गाडीवरून पडल्याने त्यांच्या पायाला इजा झाली. त्यामुळे चोरटयांनी  घटनास्थळावरून पळ काढला.  या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बेडवाल पुढील तपास  करीत आहेत.     

Web Title: Two-wheeler thieves fleeing from the mangalsutra of the woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.