म्हसरूळ परिसरात पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 00:24 IST2019-05-04T00:21:08+5:302019-05-04T00:24:27+5:30
म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरूळ परिसरात पिकअपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील महालक्ष्मी मंदिराजवळ असलेल्या महावीर कॉम्प्लेक्ससमोर पिकअप जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात बोरगड येथील एक जण ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसरूळच्या पुष्पकनगर येथील राहिवासी विजय सुभाष दंडवते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार जीपचालक किरण शशिकांत सोमवंशी याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगड येथे राहणारे साजीकुल मोहोजोद्दिन शेख हे त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक (एमएच १५ एएच १९८६) बोरगड ते म्हसरूळ गावाकडे जात असताना महालक्ष्मी मंदिरासमोर नवीन कोऱ्या पिकअपने शेख यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यात शेख दुचाकीवरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर मार लागून ते जागीच ठार झाले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून म्हसरूळ परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले असून, आत्तापर्यंत ३ ते ५ जणांचा रस्ते अपघातात बळी गेल्याने परिसरातील नागरिकांकडून या रस्त्यावर वाहतूक पोलिसांची संख्या वाढविण्याची करण्याची मागणी होत आहे.