मालेगाव : मनमाड रस्त्यावरील हॉटेल बजरंग ढाब्यासमोर दुचाकीला धडक मारून तिच्यावरील सचिन भाऊसाहेब शिंदे (२८) रा. जळगाव निंबायती या तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत होऊन अपघाताची खबर न देता पळून गेलेल्या स्प्लेंडर दुचाकीवरील अज्ञात चालकाविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणेदहा वाजता ही घटना घडली. मयताचे वडील भाऊसाहेब शिंदे यांनी फिर्याद दिली. त्यांचा मुलगा सचिन हा दुचाकीने (क्र.एम.एच.४१. ए. ई. ४९७५) मनमाडकडे जात असताना समोरुन भरधाव येणाºया स्प्लेंडर दुचाकीने त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन सचिन ठार झाला. अधिक तपास उपनिरीक्षक ठाकरे करीत आहे.
दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:06 IST