नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2022 15:58 IST2022-02-16T15:57:27+5:302022-02-16T15:58:22+5:30

डंपरच्या धडकेत विठ्ठल घुगे, सुनिता घुगे पती-पत्नीचा जागीच मृत्यू, नाशिक-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच...

Two-wheeler accident on Nashik-Pune highway, husband and wife died on the spot | नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

नाशिक-पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात, पती-पत्नीचा जागीच मृत्यू

नाशिक - पुणे महामार्गावर दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर दत्त मंदिर चौकात सद्गुरू हॉटेलसमोर सिग्नल सुटल्यानंतर एका अज्ञात डंपरने पाठीमागून दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी जागीच ठार झाले. विठ्ठल दादा घुगे आणि सुनीता घुगे, अशी मृतांची नावे असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.

अपघाताला कारणीभूत ठरलेला डंपर चालक घटना  स्थळावरून पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर दोघा पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर या ठिकाणी दूरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. 

अतिशय वर्दळीचा भाग असलेल्या नाशिक-पूणे महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात आणि आज झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Two-wheeler accident on Nashik-Pune highway, husband and wife died on the spot