आडगाव , शिंदे परिसरात दोघांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:13 IST2018-09-07T16:12:26+5:302018-09-07T16:13:19+5:30
नाशिक : आजारपण व गरिबीला कंटाळून शिंदे येथील विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़ वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़

आडगाव , शिंदे परिसरात दोघांची आत्महत्या
नाशिक : आजारपण व गरिबीला कंटाळून शिंदे येथील विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़ वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वर्षा गायधनी यांचाी काही वर्षांपूर्वी भरत गायधनी यांच्याशी विवाह झाला होता; मात्र विवाहानंतर काही महिन्यांतच पतीला मद्याचे व्यसन जडल्याने ती मानसिक तणावाखाली होती़ या दोघांना मुलगा व मुलगी असून, वर्षा ही नेहेमी आजारी राहत असे़ आजारपण, गरिबीस कंटाळून यापूर्वीही तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यावेळी ती वाचली होती़ गुरुवारी दुपारच्या सुमारस वर्षा हिने राहत्या घरी विषारी औषध सेवन केले़
ही बाब लक्षात येताच तिला तत्काळ बिटको रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
आडगाव शिवारातील चौंडेश्वरीनगरमधील तरुणाने गुरुवारी (दि़६) रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडली़ जितेंद्र सुरेश तांबे (३२, रा. शिवालय रो-हाउस, सम्राट बेकरीसमोर,आडगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र याने रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास घराच्या वरील मजल्यावरील छतास साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ दरम्यान, आत्महत्येचे कारण समजू शकले नसून याप्रकरणी आडगाव पोलिसांना ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़