शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

देशाच्या ११ सैनिकांना तब्बल ७८ लाखांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 8:48 PM

भारतीय लष्कराच्या देवळाली येथील तोफखान्यात (स्कूल आॅफ आर्टिलरी) देशसेवा बजावणाऱ्या जवानांसह ११ सैनिकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून देवळाली कॅम्पमधील भामट्यांनी तब्बल ७८ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.६) उघडकीस आला.

ठळक मुद्देशेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष

नाशिक : भारतीय लष्कराच्या देवळाली येथील तोफखान्यात (स्कूल आॅफ आर्टिलरी) देशसेवा बजावणाऱ्या जवानांसह ११ सैनिकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून देवळाली कॅम्पमधील भामट्यांनी तब्बल ७८ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.६) उघडकीस आला. संशयित भामटा सैफ कलीम शेख व सुरेश करवत्ता यांच्याविरूध्द (२६,रा.जुमा मशिदीमागे देवळाली कॅम्प) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेली माहिती अशी,नायक सुभेदार देवेंदरसिंग करनसिंग (३५रा. जयभवानी रोड, शिवज्योत गार्डन रो-हाऊस)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१६-२०१८पर्यंत देवेेंदरसिंग देवळाली कॅम्प येथे कार्यरत असताना ते येथील एका खासगी व्यायामशाळेत नियमित व्यायामाचा सराव करण्यास जात होते. या दरम्यान संशयित सैफसोबत त्यांची ओळख झाली. त्याने देवेंदरसिंग यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखविले. सुरूवातीला त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. २०१८साली त्यांची पोस्टिंग श्रीनगर जम्मू येथील तोफखाना केंद्रात झाली. त्यानंतर मार्च २०१९पासून सैफने त्याच्या भ्रमणध्वनीवरून देंवेदरसिंग यांच्याशी वारंवार संपर्क साधत गुंतवणूक केलेल्या रकमेवर निम्म्यापेक्षा अधिक रक्कमेचा नफा मिळवून देण्याचे आमीष दाखविले. त्यांनी त्यास नकार दिला असता त्याने ‘पहा, फायदा नाही झाला तर मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, की दिलेली मुद्दल रक्कम कधीही परत करेल’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर देवेंदरसिंग यांनी त्याच्या बडोदा बॅँकेमधील खातेक्रमांकावर १४ मार्च ते २एप्रिल २०१९पर्यंत १लाख रूपये जमा केले. त्यानंतर भामट्या सैफने त्यांना नफा म्हणून त्याच्या बॅँक खात्यावरून थेट देवेंदरसिंग यांच्या खात्यात १ लाख ६० हजार रूपये जमा केले. त्यामुळे देवेंदरसिंग यांचा त्याच्यावर विश्वास अधिक बळकट होत गेला. त्यानंतर त्यांनी एप्रिल महिन्यातच त्याच्या खात्यावर ९ लाख रूपये पुन्हा जमा केले. मेअखेरपर्यंत पुन्हा त्यांच्या बॅँक खात्यावर सैफने १५लाख रूपये त्याच्या वैयक्तिक बॅँक खात्यावरून जमा केले. त्यामुळे देवेंदरसिंग यांना त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला. त्यांनी त्याला बॉन्डपेपरबाबत विचारणा केली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विनयकुमार यांच्यासोबत सैफची भेट घालून दिली. सैफने त्यांनाही तसेच आमीष दाखवून एकूण ११ सैनिकांकडून आॅनलाइन रक्कम घेत गंडा घातला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयIndian Armyभारतीय जवानSoldierसैनिकfraudधोकेबाजीshare marketशेअर बाजार