देशाच्या ११ सैनिकांना तब्बल ७८ लाखांना घातला गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 08:48 PM2019-08-06T20:48:42+5:302019-08-06T20:50:10+5:30

भारतीय लष्कराच्या देवळाली येथील तोफखान्यात (स्कूल आॅफ आर्टिलरी) देशसेवा बजावणाऱ्या जवानांसह ११ सैनिकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून देवळाली कॅम्पमधील भामट्यांनी तब्बल ७८ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.६) उघडकीस आला.

Two soldiers were killed in a clash between the two soldiers of the country | देशाच्या ११ सैनिकांना तब्बल ७८ लाखांना घातला गंडा

देशाच्या ११ सैनिकांना तब्बल ७८ लाखांना घातला गंडा

Next
ठळक मुद्देशेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष

नाशिक : भारतीय लष्कराच्या देवळाली येथील तोफखान्यात (स्कूल आॅफ आर्टिलरी) देशसेवा बजावणाऱ्या जवानांसह ११ सैनिकांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीवर दामदुप्पट नफ्याचे आमीष दाखवून देवळाली कॅम्पमधील भामट्यांनी तब्बल ७८ लाख रूपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि.६) उघडकीस आला. संशयित भामटा सैफ कलीम शेख व सुरेश करवत्ता यांच्याविरूध्द (२६,रा.जुमा मशिदीमागे देवळाली कॅम्प) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवळाली कॅम्प पोलिसांनी दिलेली माहिती अशी,नायक सुभेदार देवेंदरसिंग करनसिंग (३५रा. जयभवानी रोड, शिवज्योत गार्डन रो-हाऊस)यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २०१६-२०१८पर्यंत देवेेंदरसिंग देवळाली कॅम्प येथे कार्यरत असताना ते येथील एका खासगी व्यायामशाळेत नियमित व्यायामाचा सराव करण्यास जात होते. या दरम्यान संशयित सैफसोबत त्यांची ओळख झाली. त्याने देवेंदरसिंग यांना शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखविले. सुरूवातीला त्यांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. २०१८साली त्यांची पोस्टिंग श्रीनगर जम्मू येथील तोफखाना केंद्रात झाली. त्यानंतर मार्च २०१९पासून सैफने त्याच्या भ्रमणध्वनीवरून देंवेदरसिंग यांच्याशी वारंवार संपर्क साधत गुंतवणूक केलेल्या रकमेवर निम्म्यापेक्षा अधिक रक्कमेचा नफा मिळवून देण्याचे आमीष दाखविले. त्यांनी त्यास नकार दिला असता त्याने ‘पहा, फायदा नाही झाला तर मी बॉन्ड पेपरवर लिहून देतो, की दिलेली मुद्दल रक्कम कधीही परत करेल’ असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर देवेंदरसिंग यांनी त्याच्या बडोदा बॅँकेमधील खातेक्रमांकावर १४ मार्च ते २एप्रिल २०१९पर्यंत १लाख रूपये जमा केले. त्यानंतर भामट्या सैफने त्यांना नफा म्हणून त्याच्या बॅँक खात्यावरून थेट देवेंदरसिंग यांच्या खात्यात १ लाख ६० हजार रूपये जमा केले. त्यामुळे देवेंदरसिंग यांचा त्याच्यावर विश्वास अधिक बळकट होत गेला. त्यानंतर त्यांनी एप्रिल महिन्यातच त्याच्या खात्यावर ९ लाख रूपये पुन्हा जमा केले. मेअखेरपर्यंत पुन्हा त्यांच्या बॅँक खात्यावर सैफने १५लाख रूपये त्याच्या वैयक्तिक बॅँक खात्यावरून जमा केले. त्यामुळे देवेंदरसिंग यांना त्याच्यावर पूर्णपणे विश्वास बसला. त्यांनी त्याला बॉन्डपेपरबाबत विचारणा केली नाही. त्यानंतर त्यांनी त्यांचे जवळचे मित्र विनयकुमार यांच्यासोबत सैफची भेट घालून दिली. सैफने त्यांनाही तसेच आमीष दाखवून एकूण ११ सैनिकांकडून आॅनलाइन रक्कम घेत गंडा घातला. याप्रकरणी पुढील तपास उपनिरिक्षक अंकुश जाधव करीत आहेत.

Web Title: Two soldiers were killed in a clash between the two soldiers of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.