दोन पोलीस कर्मचारी जखमी

By Admin | Updated: December 13, 2015 23:55 IST2015-12-13T23:53:48+5:302015-12-13T23:55:43+5:30

नॅनोची दुचाकीला धडक

Two policemen injured | दोन पोलीस कर्मचारी जखमी

दोन पोलीस कर्मचारी जखमी

नाशिक : भरधाव नॅनो कारने सिग्नल तोडून दुचाकीला दिलेल्या धडकेत वाहतूक शाखेचे दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी (दि़१३) सकाळच्या सुमारास कॅनडा कॉर्नर सिग्नलवर घडली़ हिरामण गणपत सोनवणे व पोपट सोनू करवाल अशी जखमी झालेल्या या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत़ त्यांना उपचारासाठी सुयश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस नाईक सोनवणे व पोलीस हवालदार करवाल हे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कॅनडा कॉर्नर सिग्नलवरून दुचाकीवर जात होते़ त्याचवेळी सिग्नल तोडून त्यांच्याच दिशेने भरधाव आलेल्या नॅनो कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली़ या अपघातात दोघांच्या पायाला जबर मार लागला असून, त्यांना त्वरित सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two policemen injured