शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलावर दोघे ठार

By admin | Updated: March 12, 2017 00:16 IST

नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपुलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

नाशिक : शनिवारी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास द्वारका येथे उड्डाणपुलावर झालेल्या ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहे. या अपघातात गंभीर जखमी असलेल्या एकाची प्रकृती चिंताजनक आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ओझरकडून नाशिककडे येणारा ट्रक (एम.एच.१८ एए९९४८) हा उड्डाणपुलावर टायर पंक्चर झाल्याने नादुरुस्त झाला. त्यामुळे चालकाने उड्डाणपुलावरील संरक्षक कठड्यालगत ट्रक उभा करून टायर बदलण्याचे काम सुरू केले. यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने (यूपी ७५ एम ५३५३) नादुरुस्त झालेल्या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत ट्रकचे टायर खोलणाऱ्या चालक, वाहकाचा जागीच मृत्यू झाला. मयत तरुणांपैकी एकाची ओळख पटली असून, महेशसिंग गंगासिंग (वय २७, रा.उंबरी मध्य प्रदेश) दुसऱ्या मयत तरुणाचे वय २२ वर्षे असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पाठीमागून धडक लेल्या ट्रकमध्ये बटाटा भरलेला होता व तो मुंबईकडे जात होता. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रुग्णवाहिका, पोलीस, क्रेन घटनास्थळी पोहचले. जखमींना तातडीने नाशिकच्या जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या अशोक मांगीलाल चव्हाण (वय २५, रा. रुई) याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक अमजद अब्दुल शकूर यास ताब्यात घेतले आहे. मुंबई नाका पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)