घोरवड घाटातील अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 01:08 IST2021-11-17T01:07:44+5:302021-11-17T01:08:09+5:30

शिवडे- सिन्नर रस्त्यावर दुचाकी व व्हॅन यांची धडक होऊन झालेल्या अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.

Two killed in Ghorwad accident | घोरवड घाटातील अपघातात दोघे ठार

घोरवड घाटातील अपघातात दोघे ठार

सिन्नर : शिवडे- सिन्नर रस्त्यावर दुचाकी व व्हॅन यांची धडक होऊन झालेल्या अपघात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला.रामदास मुरलीधर भारमल (४५) व विष्णू केरू गिरे (५३) दोघेही (रा. शिवडे, ता. सिन्नर) असे मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. शिवडे घाटात अपघात झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश परदेशी अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title: Two killed in Ghorwad accident