Two killed in Adargaon accident | म्हसरूळ, आडगाव अपघातांत दोन ठार

म्हसरूळ, आडगाव अपघातांत दोन ठार

नाशिक : दिंडोरीकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या कमलाप्रसाद सहजीवन त्रिवेदी (४१) यांच्या दुचाकीला (क्र. एमएच १५ ईडी०३२४) स्विफ्ट कारने (क्र. एमएच १५ बीके ८१७२) म्हसरूळ शिवारातील साई गार्डनसमोरील कुलकर्णी फार्मजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात त्रिवेदी गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल
दुसरा अपघात आडगाव शिवारात घडला. सागर रणदिवे (२०) व केशव गोपाळ रणदिवे (६०, रा. खेडगाव, दिंडोरी) हे दुचाकीने (क्र.एमएच ४१, के ३६८९) आडगावकडून सर्व्हिस रोडने जत्रा हॉटेलच्या दिशेने जात होते. त्यावेळी आयशरने (क्र. एमएच १५ डीके २९१३) त्यांच्या वाहनाला कट मारल्याने केशव रणदिवे रस्त्यावर पडून ठार झाले, तर सागर रणदिवे जखमी झाला आहे.

Web Title: Two killed in Adargaon accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.