मातोरीला अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 01:22 IST2019-11-12T01:22:17+5:302019-11-12T01:22:43+5:30
गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली.

मातोरीला अपघातात दुचाकीस्वार ठार
मातोरी : गावातील मुंगसरा-गिरणारे रस्त्यावर झालेल्या अपघातात जलालपूर येथील एका तीस वर्षीय दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास घडली.
राज्य महामार्ग क्र मांक-२८ वर दिवसभरातील मोलमजुरीचे काम आटोपून घरी परतत असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार मजूर पांडुरंग लक्ष्मण गबाले यांच्या दुचाकीला (एम.एच.१५ बी.एस.८४९३) जबर धडक दिली. या धडकेत गबाले यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मातोरी गावातील पोलीसपाटील रमेश पिंगळे यांनी तालुका पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाचा पंचनामा करत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.