देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त

By Admin | Updated: September 20, 2014 00:35 IST2014-09-17T01:17:30+5:302014-09-20T00:35:44+5:30

देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त

Two indigenous pistols seized | देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त

देशी बनावटीची दोन पिस्तुले जप्त

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरातील हॉटेल संतोषसमोर दोघांकडून दोन देशी बनावटीची दोन पिस्तुले गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-३ ने सोमवारी रात्री जप्त केली़ या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे़
संशयित वैभव रवींद्र विसपुते (२३, रा़ भगवती चौक, उत्तमनगर, सिडको) व त्याचा साथीदार जितेंद्र सुरेश बाविस्कर (२२, रा़ वासननगर, कैलास रो-हाऊस नंबर ३, पाथर्डी फाटा) यांच्याकडे दोन देशी बनावटीची पिस्तुले असून, ते हॉटेल संतोष येथे येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विलास गांगुर्डे, गंगाधर केदार यांना मिळाली होती़ या माहितीवरुन पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक जी़ डी़ देवडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव, पंडित चौरे, जाकिर शेख, सुभाष गुंजाळ, मुरलीधर गुंबाडे, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, राजेंद्र जाधव, पोलीस शिपाई संतोष कोरडे, मोहन देशमुख, शंकर गडदे, इरफान शेख, महिला पोलीस नाईक ललिता अहेर यांनी पाथर्डी फाटा येथून दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ८० हजार रुपये किमतीची दोन देशी बनावटीची पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे जप्त केली़ या दोन्ही संशयितांची सखोल चौकशी केली असता त्यांना ही पिस्तुले सातपूरच्या जगतापवाडीतील संशयित प्रवीण भीमराव येवले याने विकल्याचे सांगितले़ पोलिसांनी या तिघाही संशयितांविरुद्ध इंदिरानगर पोलीस ठाण्यात बेकायदेशीर व विनापरवाना पिस्तूल बाळगल्या प्रकरणी पोलीस नाईक केदार यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Two indigenous pistols seized