शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
4
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
5
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
6
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
7
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
8
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
9
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
10
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
11
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
12
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
13
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
14
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
15
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
16
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
17
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
18
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
19
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
20
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे धार्मिक संस्था जागेसाठी आग्रही

By admin | Updated: March 21, 2015 23:28 IST

कुंभमेळा : ताळमेळ बसविण्याचे प्रशासनापुढे आव्हान

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांसाठी तपोवनात साधुग्रामसाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने त्यासाठी जिल्हा प्रशासन दमछाक करीत असतानाच, आखाडे-खालशांपेक्षा देशभरातील सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी तपोवनात जागांसाठी आग्रह धरल्याने प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. मुळात आखाडे, खालशांसाठी तपोवनातील जागा पुरेशी नसताना, त्यात जागेची मागणी करणाऱ्या या संस्थांनी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या शिफारशी त्यासाठी सादर केल्यामुळे ताळमेळ बसविणे अवघड होऊन बसले आहे.तपोवनात साधुग्रामसाठी आजपावेतो सुमारे २८३ एकर जागा तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून जिल्हा प्रशासनाने ती महापालिकेकडे सुपूर्द केली असून, त्यावर कामकाजास सुरुवात झालेली आहे. गेल्या कुंभमेळ्यापेक्षा यंदाच्या कुंभात साधू-महंतांचे आखाडे व खालशांची संख्या अधिक राहणार असल्याने किमान पाचशे एकर जागेची मागणी साधू-महंतांनी यापूर्वी केली होती; परंतु प्रशासनाने केलेल्या नियोजनात सव्वातीनशे एकर जागेवर साधुग्राम उभारण्याची तयारी दर्शविली व त्यास काहीअंशी साधू-महंतांनीही सहमती दर्शविली. परंतु सद्यस्थितीत सव्वातीनशे एकर जागाही पूर्ण ताब्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तपोवनातील जनार्दन आश्रम, तपोवन ब्रह्मगिरी आश्रम अशा पाच आश्रमांच्या ताब्यात असलेली ३३ एकर जागा देण्यास नकार दिला आहे. या आश्रमांच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार सिंहस्थात त्यांच्या आश्रमातही साधू व भाविक मोठ्या संख्येने येणार असल्याने त्यांच्या सोयीसाठीच ही जागा ताब्यात ठेवल्याचे म्हणणे आहे. त्यामुळे सद्यस्थितीत तपोवन २८३ एकर वरच उभे राहणार असून, त्यातील जागेचे वाटप आखाड्यांच्या मागणीनुसार केले जाणार आहे. तत्पूर्वीच गेल्या महिन्यापासून सुमारे दोनशेहून अधिक धार्मिक संस्थांनी दोन ते पाच एकर जागा कुंभमेळ्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी मिळावी म्हणून मागणी करण्यास सुरुवात केली आहे. अलाहाबाद, उज्जैन, मथुरा, दिल्ली, हरिद्वार, मुंबई, जयपूर, बिहार अशा देशातील प्रमुख धार्मिक ठिकाणांहून जिल्हा प्रशासनाकडे पत्रांचा वर्षाव होत आहे. जागा मागणीच्या या पत्रांबरोबर राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व आमदार, खासदार, मंत्र्यांचे शिफारसपत्र सोबत जोडले जात असल्यामुळे या मागणीचा अनादर कसा करावा, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. एकीकडे साधुग्रामसाठी अपुरी जागा त्यातच धार्मिक संस्थांचे तगादे पाहता साधुग्रामचा ताळमेळ बसविणे अवघड झाले आहे. तरीही साधुग्रामच्या जागेसाठी अगोदर आखाडे, खालशांना प्राधान्य देण्याचे व त्यानंतर धार्मिक संस्थांचा विचार करण्याचे ठरले आहे.