अश्विनी बोरणारे दोन सुवर्णपदकांची मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 01:21 IST2020-01-11T23:10:16+5:302020-01-12T01:21:32+5:30
अश्विनी बोरणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. एम. फार्मसीच्या अंतिम वर्षात प्रथम क्र मांकाने यश संपादन केल्याने तिचा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवराम गोपालकृष्ण भडबडे आणि प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सुवर्णपदकांनी गौरव करण्यात आला.

कुलगुरुडॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारताना अश्विनी बोरणारे.
पाटोदा : येथील अश्विनी बोरणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दोन सुवर्णपदकांची मानकरी ठरली आहे. एम. फार्मसीच्या अंतिम वर्षात प्रथम क्र मांकाने यश संपादन केल्याने तिचा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात कुलगुरु डॉ. नितीन करमळकर व मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिवराम गोपालकृष्ण भडबडे आणि प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सुवर्णपदकांनी गौरव करण्यात आला.
राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, डॉ. रवींद्र सपकाळ, कल्याणी सपकाळ, प्राचार्य एस.बी. गोंदकर, सहकार नेते अंबादास बनकर, अरु ण थोरात, संजय बनकर, साहेबराव आहेर, अशोक मेंगाणे, सरपंच चंद्रकला नाईकवाडे, उपसरपंच दिलीप बोराडे, कारभारी बोराडे, गणपत भवर, साहेबराव बोराडे, रमेश बोरनारे, रतन बोरनारे प्रभाकर बोरनारे, संपत बोरनारे, संजय बोरनारे, जाफर पठाण आदींनी अश्विनीचा सत्कार केला.