Ashok Kharat News Latest: भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या सीए अन् एका सराफाची चौकशी झाल्यानंतर एसआयटीने आपला मोर्चा खरातला गुंगीचा पदार्थ बनवून देणाऱ्या व विकणाऱ्या दोन संशयित डॉक्टर आणि एका मेडिकल चालकाकडे वळविला आहे. एसआयटीने या तिघांची चौकशी केली आहे. त्यामुळे खरातभोवतीचा फास अधिकच घट्ट होताना दिसत आहे.
फॉरेन्सिक टीमने दोन दिवसांपूर्वी अशोक खरात याच्या नाशिकमधील ओकस प्रॉपर्टी या ऑफिसमध्ये जाऊन औषधाची एक बाटली ताब्यात घेतली होती. त्या अनुषंगाने एसआयटीने डॉक्टर, तसेच मेडिकल चालकाची चौकशी केल्याचे सांगण्यात येत आहे.
खरात महिलांना देत असलेला गुंगीचा पदार्थ काय, तो कुठे खरेदी करायचा?
पीडित महिलांना खरात पाण्यात एक पदार्थ मिसळून देत असे. ते पाणी पायल्यावर महिलांना गरगरल्यासारखे होत होते. त्यानंतर खरात महिलेचे लैंगिक शोषण करीत असे. त्यामुळे हे औषध कोणते, त्याच्यात काय मिसळले जात होते, ते कुठून खरेदी केले जात होते, याची माहिती एसआयटीने संबंधित डॉक्टर, तसेच मेडिकल चालकाकडून घेतली.
अधिकारीही मिरगावला
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही अधिकारीदेखील खरातच्या आश्रमात जाऊन तेथे काही राजकीय नेत्यांना भेटत होते. राजकीय नेते तेथे आले की ते अधिकाऱ्यांना बोलवून घेत होते. अधिकाऱ्यांना तेथे का बोलवले जात होते? याची प्रशासनात चर्चा सुरू आहे.
खरात प्रकरणात राज्य सरकार सुरुवातीपासून अत्यंत संवेदनशील आणि तत्परतेने कारवाई करत असल्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कोणतीही ढिलाई करणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. खरातवर प्रतिक्रिया दिली नसल्याची टीका त्यांच्यावर होत होती.
खरातच्या आर्थिक साम्राज्याची स्वतंत्र चौकशी?
खरातला अटक झाल्यानंतर 'एसआयटी'ने खरातने केलेले लैंगिक शोषण यासंदर्भात भक्कम पुरावे गोळा केले. मात्र, हा तपास करताना एसआटीसमोर खरातच्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अनेक धक्कादायक तपशील बाहेर आले. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढल्याने एकावेळेस गुन्ह्याचे अनेक कंगोरे तपासताना पोलिसांच्या आर्थिक पथकाकडून खरातने जमविलेल्या आर्थिक मायाजालाची स्वतंत्र चौकशी केली जाऊ शकते.
Web Summary : Ashok Kharat's accomplices, two doctors and a medical store worker, face scrutiny for allegedly providing substances used to drug women. Authorities are investigating their involvement in the Kharat case, focusing on the source and nature of the substances.
Web Summary : अशोक खरात के दो डॉक्टर और एक मेडिकल स्टोर कर्मचारी पर महिलाओं को नशीला पदार्थ देने का आरोप है। अधिकारी खरात मामले में उनकी संलिप्तता की जांच कर रहे हैं, जिसमें पदार्थों के स्रोत और प्रकृति पर ध्यान केंद्रित किया जा रहा है।