ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 17:11 IST2018-09-24T17:08:21+5:302018-09-24T17:11:10+5:30
नाशिक : सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉईंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ अमोल बाबाजी शेळके (१८, गायकवाड मळा, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव असून तो आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे़

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महाविद्यालयीन युवक ठार
नाशिक : सिमेंटच्या गोण्या वाहून नेणाऱ्या भरधाव ट्रकने अॅक्टिवा दुचाकीला दिलेल्या धडकेत महाविद्यालयीन युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़२४) सकाळी नाशिकरोड-बिटको पॉईंटच्या दुर्गा उद्यानाजवळ घडली़ अमोल बाबाजी शेळके (१८, गायकवाड मळा, नाशिकरोड) असे अपघातात मृत्यु झालेल्या युवकाचे नाव असून तो आरंभ महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायकवाड मळ्यातील रहिवासी असलेला अमोल शेळके हा सकाळी आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास अॅक्टिव्हा दुचाकीमध्ये (एमएच १५, जीके ६९९७) पेट्रोल टाकण्यासाठी स्टेशनच्या दिशेने जात होता़ बिटको हॉस्पिटलजवळील रजनीगंधा हॉटेलसमोर सिमेंटच्या गोण्या भरून घेऊन जाणाºया भरधाव ट्रकने (एमएच १५ सीके ३६०) अमोलच्या अॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली. या अपघातात अमोलच्या अंगावरून ट्रकचे टायर गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नाशिकरोड पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.