शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस वर्षांपूर्वीही असाच धुडगूस

By admin | Updated: January 15, 2015 23:20 IST

गांधीनगर घटनेची आठवण ताजी : तीन दिवस लष्करी जवानांनी घातला होता हैदोस

नाशिक : उपनगर लगतच असलेल्या गांधीनगर वसाहतीत सुमारे २५ वर्षांपूर्वी लष्करी जवानांनी असाच धुडगूस घातल्याची आठवण उपनगर पोलीस ठाण्यावरील हल्ल्याच्या घटनेने ताजी झाली. १९९०-९१ मध्ये स्थानिक तरुणांशी झालेल्या वादानंतर तोफखाना येथील लष्करी जवानांनी गांधीनगर मार्केटमध्ये अनेकांना मारहाण केली होती. त्या तरुणांच्या शोधासाठी जवानांनी सतत तीन दिवस परिसरात दिसेल त्यास मारहाण चालविली होती. काल दिवसभर या घटनेची चर्चा परिसरात सुरू होती. लष्करी जवानांनी उपनगर पोलीस ठाण्यावर हल्ला चढविल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. यापूर्वीही अशा प्रकारचा धुडगूस येथील नागरिकांनी अनुभवला असल्याचे सांगितले. काही जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सुमारे २५ वर्षांपूर्वी गांधीनगर मार्केटमध्ये जवानांनी असाच हल्ला केला होता. त्याकाळी येथील संपूर्ण वसाहतीत कुटुंबे वास्तव्यास होती, त्यामुळे मार्केटमध्ये बरीच गर्दी होत असे. आजूबाजूच्या परिसरात कुठेही भाजीबाजार नसल्याने लष्करी जवानदेखील गांधीनगरच्या मार्केटमध्येच येत असत. १९९०-९१ मध्ये मीलिटरीचे काही जवान आणि स्थानिक मुलांमध्ये वाद झाले. यातून जवान आणि मुलांमध्ये हमरीतुमरी होऊन झटापटी झाली. या घटनेनंतर तेथून निघून गेलेले जवान आपल्या सहकाऱ्यांसह सायंकाळी दोन ते तीन मीलिटरी वाहनांमधून गांधीनगरला आले. ‘वो लडके कौन थे’ असे म्हणत त्यांनी दिसेल त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. भाजीवाले, दुकानदार याबरोबरच परिसरात फिरणारे वयोवृद्ध यांनादेखील मारहाण करण्यात आल्याचे सांगितले जाते. काहींना घरात घुसून मारहाण करण्यात आले. लष्करी जवानांच्या त्या दिवशी कुणीही हाती लागले नाही. त्यामुळे त्यांनी सलग तीन दिवस गांधीनगरला ‘टार्गेट’ केले होते. त्यावेळची पोलीस कुमकही कमी होती, त्यामुळे पोलिसांचा हस्तक्षेप झाला नाही. तीन दिवसानंतर जिल्हा प्रशासनाच्या मध्यस्थीने लष्करी जवान शांत झाले. देशाच्या रक्षणकर्त्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात अशी भीतीदायक आठवण राहणार असेल तर जवानांचा आदर्श आणि शौर्य गाथा काय सांगणार अशी भावना अनेक वयोवृद्धांनी या घटनेनंतर व्यक्त केली. (प्रतिनिधी)