शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात राज्यपाल दौऱ्याची जय्यत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST

यासंदर्भात माहिती देताना नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त ...

यासंदर्भात माहिती देताना नगराध्यक्ष सुनील मोरे म्हणाले की, राज्यपाल कोश्यारी, पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खा. सुभाष भामरे, आ.जयकुमार रावल,आ. दिलीप बोरसे यांचे सकाळी १० वाजता शहरात आगमन होत आहे. राज्यपाल कोश्यारी यांचा शासकीय दौरा नगरपालिकेस प्राप्त झाला आहे.

स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच पुरोहितांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्यपाल कोश्यारी यांना माहिती देण्यासाठी हिंदी, मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या पाच व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली असून ते मान्यवरांना स्मारकाविषयी माहिती देणार आहेत. दगाजी सिनेमा पॅलेस येथे होणाऱ्या समारंभस्थळी राज्यपालासांठी खास ग्रीन रूम बनविण्यात आली आहे. तर शासकीय विश्रामगृह चिनार हे कमी पडत असल्याने त्या ठिकाणीदेखील तीन ग्रीन रूम बनविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यांची डागडुजी युध्दपातळीवर करण्यात येत असून शहरातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिले जात आहे. राज्यपाल व मंत्री येणार असल्याने सटाणा-देवळा रस्त्यावर दोन हेलिपॅड उभारण्यात येत आहेत. राज्यपालांच्या दौरा पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली आहे. त्यांनी केलेल्या सूचनांचे पालिका प्रशासन व देवस्थानने तंतोतंत पालन करून पालिका प्रशासनाने दौरा यशस्वीतेसाठी कंबर कसली असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी दिली आहे.