शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:55 IST

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ६५ टक्के मतदान

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील जि.प.चे तीन व पंचायत समितीच्या सहा गट-गणांसाठी आज सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० पर्यंत ११५ बूथवर अत्यंत शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. तालुक्यात एकूण ९६०८४ मतदार ्सून ५०१२९ पुरुष मतदार व ४५९५५ स्त्री मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होत्या. सकाळी मतदानाचा वेग कमी होता. त्यानंतर मतदानाचा वेग वाढला होता. सकाळ नंतर अनेक ठिकाणी मतदान उत्साहात पार पडले.वृद्ध, दिव्यांग तसेच नव मतदार यांचा उत्साह दिसून आला. तळेगाव, काचुर्ली, सापगाव, शिरसगाव, धुमोडी, आंबोली, पिंपळद, वेळुंजे, तळवाडे, अंजनेरी आदि गावांना महिलांचा उत्साह दिसून आला. तर वृद्ध-मध्यमवर्यान आदि लोक मतदान करीत होते. सापगाव येथील तीन नव मतदार व शिरसगाव येथील कु. मथुरा संजय दिवे, किरण दिनकर मोंढे यांना मतदारांचे कुतुहल होते.  त्र्यंबक तहसिल कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी सुरेखा चव्हाण, तहसिलदार महेंद्र पवार, निवडणुक प्रमुख निवासी नायब तहसिलदार मोहन कनोजे, नायब तहसिलदार (निवडणुक) राजेंद्र कांबळे, नायब तहसिलदार (प्रशासन) सुरेश निरगुडे आदि तळ ठोकून कार्यालयात होते.दरम्यान गटाचे १४ व गणांचे ६ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले आहे. किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. साडे अकरा बारा नंतर मतदानाचे टक्के हळूहळू वाढू लागले. चारही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. नोटाबंदीचा फटका ग्रामीण भागात काहीसा बसला. निसर्ग राजाने त्र्यंबक तालुक्यावर कृपा केल्याने बळीराजा आनंदात दिसत होता. पो.नि. सुधाकर मांडवकर, पो.उ.नि. सुरेश चौधरी, पो.उ.नि. किरण मेहेर, कैलास आकुले यांनी जादा कुमकेसह पोलीस बंदोबस्त कडक लावला होता. त्यामुळे कुठेही वातावरण चिघळले नव्हते.