शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

बहुमतासाठी ‘नवख्या’ संचालकांची धडपड

By admin | Updated: January 24, 2016 00:10 IST

जिल्हा बॅँक : अल्पमतातील संचालकांच्या ‘बैठका’ सुरू

नाशिक : घोटाळेबाज संचालकांना दहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा राज्य शासनाने निर्णय घेताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेतील अल्पमतात येऊ शकणाऱ्या दहा संचालकांनी तातडीने बैठक घेऊन स्वीकृत संचालक नेमण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त आहे.दरम्यान, अल्पमतात येऊ नये, म्हणून दहा संचालकांनी धावपळ सुरू केली आहे. विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी राज्याचे सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधत नेमका अध्यादेश काय आणि त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या संचालक मंडळावर नेमका काय परिणाम होईल? याची विचारणा केल्याचे समजते. मात्र सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपल्याला यातील फारसे काही माहित नाही. आपण माहिती मागविली आहे. त्यानंतर तुम्हाला नेमके सांगतो, असे सांगितले. तर अन्य एका संचालकांनीही दादा भुसे यांची भेट घेऊन ९७व्या घटनादुरुस्तीसह कलम ७७ (अ) बाबत विचारणा केली असता नव्या अध्यादेशानुसार ते कलमच रद्द करण्यात आल्याचे त्या संचालकाला सांगण्यात आल्याचे कळते.काल चौथा शनिवार सुट्टी असूनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मुख्यालयात काही आजी-माजी संचालकांनी अनौपचारिक बैठक घेतल्याचे कळते. या बैठकीत शासन अध्यादेशामुळे जिल्हा बॅँकेचे २१ पैकी ११ संचालक अपात्र ठरल्यानंतर अल्पमतात आलेल्या दहा संचालकांचे काय? ते अपात्र ठरणार काय याबाबत चर्चा करण्यात आल्याचे कळते. जिल्हा बॅँकेला दोन स्वीकृत संचालक नियुक्त करता येतात, त्यात एक तज्ज्ञ वास्तूविशारद आणि लेखापरीक्षक नियुक्त करता येतो. त्यांच्या नियुक्त्या तातडीने करून अल्पमतातील दहा संचालक बहुमतात येण्यासाठी ही मॅजिक फिगर गाठण्यासाठी या दहा संचालकांची लगबग सुरू झाली आहे.कालच्या बैठकीत येवला, नाशिक, मालेगावसह अन्य तालुक्यांतील संचालक या अनौपचारिक बैठकीसाठी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील तारखा टाकून स्वीकृत संचालकांची नियुक्ती करण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्या स्वीकृत संचालकांची गणना गणपूर्तीत होते काय? हाच खरा कळीचा मुद्दा आहे.(प्रतिनिधी)