शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
3
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
4
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
5
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
6
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
7
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
8
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
9
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
10
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
11
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
12
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
13
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
14
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
15
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
16
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
17
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
18
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
19
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
20
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी बचावकृती समितीतर्फे

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

तहसिल कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन

सुरगाणा : आदिवासी जमातीच्या आरक्षणात धनगर जातीचा समावेश करू नये यासाठी आदिवासी समाज बचाव कृती समितीतर्फे तहसिल कार्यालयावर आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी हजारो समाज बांधव, विद्यार्थी, आदिवासी सामाजिक संघटना, आदिवासी कर्मचारी संघटना, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चासाठी सर्वच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने पोलीस परेड मैदानावर एकत जमले घोषणा देत, हातात बॅनर घेत मोर्चा बसस्थानक तेलीगल्ली मार्गे तहसील कार्यालयात पोहचला, या मोर्चाचे रूपांतर तहसिल कार्यालयाच्या आवारात सभेत झाले. यावेळी माजी आमदार जीवा गावीत, हेमंत वाघेरे, भिका राठोड, सुभाष चौधरी, उर्मिला गावित, सावळीराम पवार, रंजित गावित, समीर चव्हाण, पी. के. चव्हाण, आर. डी. भोये, जयराम गावित, राम चौरे, राजेश गावित, पंकज ठाकरे, तुळशिराम खोटरे, ज्ञानदेव पवार, आर. एच. गांगुर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी परशराम बिरारी, माधुरी गवळी, डॉ. हिरामण गावित, धमेंद्र पगारीया यांनी मनोगत व्यक्त केले. या आरक्षण बचाव कृती समितीमध्ये आदिवासी कर्मचारी संघटना, विश्वास फ्रेंड सर्कल, हिंदुस्थानी कला व क्रिडा प्रसारक मंडळ सुरगाणा, युवा फेरडरेशन, स्टुडंट फेडरेशन शाखा सुरगाणा, आदिवासी हक्क संरक्षण समिती सह विविध आदिवासी संघटना सहभागी झाल्या होत्या. या मोर्चात हिरामण गावित, वसंत बागुल, भाजपाचे तालुका अध्यक्ष सुरेश गवळी, मनसेचे तालुका अध्यक्ष मनोहर खंबायत, जयराम गावित, काशिनाथ गायकवाड, वसंत राठोड, गंगाराम गावित, राष्ट्रवादीचे सरचिटणीस भास्कर चौधरी, कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी एस. के. चौधरी, पांडुरंग पवार, प्रभाकर महाले, नामदेव चौधरी, सुधाकर भोये सह सुमारे पाच हजारपेक्षा जास्त आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी तहसिलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करणेत आले. मोर्चाचा अध्यक्षस्थानी उपसभापती इंद्रजित गावित होते तर सूत्रसंचलन रतन चौधरी यांनी केले. फोटो - १) तहसिलदार रशिद तडवी यांना निवेदन सादर करतांना मा.आमदार जे. पी. गावित, राम चौरे, इंद्रजित गावित, समिर चव्हाण, जयराम गावित, प्रभाकर महाले आदी.२) मोर्चात सहभागी सभापती मंदाकिनी भोये, इंद्रजित गावितसह महाविद्यालयातील विद्यार्थी३) आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीला मार्गदर्शन करतांना जे. पी. गावित.