दिंडोरीमध्ये आदिवासींचा मूकमोर्चा

By Admin | Updated: November 18, 2016 13:34 IST2016-11-18T13:34:12+5:302016-11-18T13:34:12+5:30

 ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 18 - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आदिवासी आश्रम शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ दिंडोरी येथे ...

Tribal Democrats in Dindori | दिंडोरीमध्ये आदिवासींचा मूकमोर्चा

दिंडोरीमध्ये आदिवासींचा मूकमोर्चा

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 18 - बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे आदिवासी आश्रम शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ दिंडोरी येथे आदिवासींनी मूक मोर्चाचे आयोजन केले होते. आश्रमशाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी निळवंडी रोडपासून तहसील कार्यालय दिंडोरीपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. 
 
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृहांसह राज्यातील अन्य मुलींचे वसतिगृह तसेच स्री सुरक्षासारख्या अन्य प्रमुख मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये आदिवासी लोकांसोबत आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार रामदास चारोस्कर सहभागी झाले होते. दरम्यान, महिलांची संख्या जास्त होती. 
(व्हिडीओ - सुयोग जोशी)
 
 

https://www.dailymotion.com/video/x844iiu

Web Title: Tribal Democrats in Dindori