शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सोळा लाख विद्यार्थ्याची कलचाचणी ; नाशिकच्या दोन लाख विद्यार्थ्यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 18:55 IST

दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.

ठळक मुद्देराज्यातून सोळा लाख विद्यार्थ्यांनी दिली कलचाचणी नऊ विभागात मोबाईल अॅपद्वारे परीक्षा

नाशिक: दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कल चाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.शैक्षणिक क्षेत्रात भविष्यातील करिअरच्या वाटा निवडताना तसेच शिक्षणासाठी कोणते क्षेत्र निवडावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या या कलचाचणीसाठी यावर्षी प्रथमच सर्वत्र मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पालकांचेही या परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळाल्याचे नाशिक जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे समुपदेशक किरण बावा यांनी सांगितले.  

विभागनिहाय प्रविष्ठ विद्यार्थीराज्यातील नऊ विभागांपैकी पुणे विभागातून २ लाख ६९ हजार २३४ विद्याथ्यांनी ही परीक्षा दिली, तर नागपूरमधून १ लाख ६१ हजार ७४६, औरंगाबादमधून १ लाख ८२ हजार २२८, मुंबईतून ३ लाख ४१ हजार  ९०१, कोल्हापूरमधून १ लाख ३९ हजार ७९५, अमरावतीतून १ लाख ६६ हजार, २९६,  नाशिकमधून  १ लाख ९९ हजार ५३४, लातूरचे १ लाख ६ हजार ६२२ व कोकणातून ३४ हजार ५३० असे एकूण १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी कल चाचणी परीक्षा दिली.  

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकStudentविद्यार्थीTeacherशिक्षकexamपरीक्षा