शिवसेनाच्यावतीने रस्त्यात वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:26 IST2020-07-09T20:35:20+5:302020-07-10T00:26:12+5:30

दिडोंरी : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने लखमापुर ते भनवड रस्त्यावर शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख अरु ण वाळके यांच्यावतीने खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.

Tree planting in the road on behalf of Shiv Sena | शिवसेनाच्यावतीने रस्त्यात वृक्षारोपण

शिवसेनाच्यावतीने रस्त्यात वृक्षारोपण

दिडोंरी : तालुक्यातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे शिवसेनेच्यावतीने लखमापुर ते भनवड रस्त्यावर शिवसेना ग्रामीण उपजिल्हा प्रमुख अरु ण वाळके यांच्यावतीने खड्डेमय झालेल्या रस्त्यावर वृक्षारोपण करून आंदोलन करण्यात आले.
दिडोंरी तालुक्यातील अनेक रस्ते खड्डेमय झाले असुन त्याकडे प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसुन येत आहे. लखमापुर याचा परिसर हा एम आय डी सी असुन मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत. यामुळे ग्रामीण भागात प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.
येत्या आठवड्यात हे रस्त्यांची डागडुजी केले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करीत उपअभियंता यांच्या खुर्चीला काळे फासण्यात येईल असा इशारा वाळके यांनी दिला. कोशिंबे, दहेगांवफाटा, करंजवन, आदी अनेक लहानमोठ्या खेड्यां साठी हा महत्वाचा रस्ता आहे, या भागातील शेतीमाल असेल किंवा औद्योगिक क्षेत्रातील वाहतुक असेल खड्डयामुळे खुपच त्रासदायक झाले आहे . यामुळे शिवसेना च्या वतीने या रस्त्यांवरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रदिप देशमुख, जगन् सताळे, उज्वला बोराडे, सरला सोनवणे, संग्राम देशमुख, निलेश शिंदे, राहुल गणोरे उपस्थित होते.

Web Title: Tree planting in the road on behalf of Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक