शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना दिलासा : होमिओपॅथीसाठी आता पार्टटाइम

By admin | Updated: September 11, 2015 00:58 IST

‘फार्माकोलॉजी’होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीचा मार्ग मोकळा

नाशिक : होमिओपॅथीची प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्याबाबत तयार करण्यात आलेला ‘फार्माकोलॉजी’ हा अभ्यासक्रम अखेर अंशकालीन करण्याचा निर्णय आरोग्य विद्यापीठाने घेतला आहे. गेल्या वर्षभरापासून यासाठी होमिओपॅथी डॉक्टर्स संघटनेच्या वतीने प्रयत्न सुरू होते. या निर्णयामुळे राज्यातील ६१ हजार होमिओपॅथी डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी मिळावी यासाठी गेल्या ३४ वर्षांपासून लढा सुरू होता. याप्रकरणी संघटनेचे नेते डॉ. अरुण भस्मे यांनी नागपूर अधिवेशनकाळात बारा दिवस उपोषणही केले होते. १३ आॅगस्ट २०१४ रोजी शासनाने एक अद्यादेश काढून होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची परवानगी देताना एक समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार होमिओपॅथी डॉक्टारांना एकवर्ष मुदतीचा ३०० तासांचा ‘ फार्माकोलॉजी’ अभ्यासक्रम शिकण्याची सक्ती करण्यात आली होती. सदर अभ्यासक्रम राबविण्याची आणि परीक्षेची जबाबदारी शासनाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे सोपविली होती; परंतु विद्यापीठाने ३०० तासांच्या अंशकालीन अभ्यासक्रमाऐवजी २१०० तासांचा दीर्घ आणि पूर्णवेळ अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने त्यास होमिओपॅथी डॉक्टरांनी विरोध केला होता. दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि त्यासाठी वेळ द्यावा लागणार असल्याने डॉक्टरांची नियमित प्रॅक्टीस बंद होण्याचा धोका तसेच अभ्यासक्रमाला प्रतिसाद न मिळण्याची बाबही विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर विद्यापीठाने एक समिती गठित केली होती. या समितीने दिलेल्या अहवालानुसार विद्यापीठाच्या विद्या परिषदेत अंशकालीन अभ्यासक्रमाचा निर्णय आज जाहीर करण्यात आला. त्यानुसार आता होमिओपॅथी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांना चार तास प्रॅक्टीकल, चार तास लेक्चर आणि चार तास कॅज्युल्टी विभागात अनुभव घ्यावा लागणार आहे. आठवड्यातून दोन दिवस हा अभ्यासक्रम शिकविला जाणार आहे. एक वर्ष मुदतीतील हा अभ्यासक्रम सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधून शिकविला जाणार असून, येत्या काही दिवसांत यात आणखी काही महाविद्यालयांचा समावेश होणार आहे, तर जे विद्यार्थी होमिओपॅथी शिकत आहेत आहेत, त्यांच्या अभ्यासक्रमातच ‘फार्माकोलॉजी’ अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे. नोव्हेंबरपासून फार्माकोलॉजीसाठी प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार असल्याचे समजते.