शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘कचऱ्यातून नंदनवन’ उपक्रम

By admin | Updated: June 10, 2016 22:24 IST

महेश नवमी : माहेश्वरी भवन येथे विविध कार्यक्रम

नाशिकरोड : घरातील कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची जबाबदारी गृहिणींची असून, ती व्यवस्थितपणे नीट पार पाडल्यास कचऱ्यातून नंदनवन निर्माण होईल, असे प्रतिपादन मंजू नावंदर व किरण झंवर यांनी केले. आर्टिलरी सेंटररोड येथील श्रीमती मोनाबाई नंदलाल राठी माहेश्वरी भवन येथे शुक्रवारी दुपारी भगवान श्री महेश नवमीनिमित्त आयोजित ‘कचऱ्यातून नंदनवन’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून झाले. यावेळी मंजू नावंदर व किरण झंवर यांनी उपस्थिताना प्रत्येक प्रकारचा कचरा वेगळा असतो, असे सांगून स्लाइड-शोद्वारे इलेक्ट्रॉनिक, प्लास्टिक, कुजणारा (स्वयंपाकघरातील), देवाचे निर्माल्य आदि प्रकारच्या कचऱ्याचे फायदे व तोटे स्पष्ट करून सांगितले. ओला व सुका कचरा याचे वर्गीकरण कसे करावे तसेच स्वयंपाकघरातील कुजणारा कचरा व झाडांचा पालापाचोळा यातून खताची निर्मिती कशी करता येते याची सविस्तर माहिती नावंदर व झंवर यांनी दिली. कचऱ्याचे वर्गीकरण करून विल्हेवाट लावल्यास कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊन पर्यावरणाची होणारी हानी ही कमी झाल्याशिवाय राहणार नाही, असे नावंदर व झंवर यांनी स्लाइड-शोद्वारे स्पष्ट करून सांगितले. पुणे येथील संदीप बाहेती यांचे पसायदानावरील व्याख्यान झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माहेश्वरी प्रगती मंडळचे अध्यक्ष श्रीनिवास लोया, अशोक भट्टड, राधेश्याम राठी, महेश बूब, मुकेश चांडक, दिनेश करवा, रमेश कासट, दीपिका कापडिया, वर्षा कलंत्री आदि मान्यवर उपस्थित होते. परिचय श्रद्धा कासट व सूत्रसंचालन मीनल बियाणी यांनी केले. यावेळी कांता लोया, वर्षा कलंत्री, मंगल नावंदर, आशा जाजू, कल्पना लोया, अरुणा कलंत्री, शशिकला बूब, राखी लोया, स्वाती झंवर, प्रणिता भुतडा, अलका करवा, आशा राठी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)