अवैध जनावरांची वाहतूक; ट्रक जप्त

By Admin | Updated: September 26, 2014 23:38 IST2014-09-26T23:38:13+5:302014-09-26T23:38:39+5:30

अवैध जनावरांची वाहतूक; ट्रक जप्त

Trafficking of illegal animals; Seized truck | अवैध जनावरांची वाहतूक; ट्रक जप्त

अवैध जनावरांची वाहतूक; ट्रक जप्त

पिंपळगाव बसवंत : वडाळीभोई शिवारात मालेगावला कत्तलीसाठी जाणाऱ्या २९ गायींसह ४२ जनावरांचा ट्रक अहिंसा संघाच्या सदस्यांनी पकडून पोलिसांच्या हवाली केला. ट्रकमध्ये अत्यंत क्रुरपणे गायींना अक्षरश: एकावर एक रचून नेले जात होते. यात पाच गायी व एक वासरू मृत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत अहिंसा संघाने वडनेर भैरव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गायी व जनावरे भरलेला ट्रक जात असल्याची माहिती अहिंसा संघाचे म्हाळसाकोरे ता. निफाड येथील कार्यकर्ते विकास नवनाथ गुंजाळ यांच्या सह नारायण परशराम भपकार, जियसंग रतनलाल राजपुरोहित, पंढरीनाथ सुकदेव मुरकुटे, राजेंद्र दत्तू पडोळ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी थांबून पोलिसांना याबाबत माहिती देवून गाडीचा वडाळीभोई येथे पाठलाग केला. ट्रग चालकाला संशय आल्याने त्याने गाडी पुन्हा पिंपळगाव च्या दिशेने फिरवून पळ काढला. (वार्ताहर)

Web Title: Trafficking of illegal animals; Seized truck